म्हणून …रुपाली चाकणकरांना लावणी महोत्सव आणि भेळ पार्टीचं निमंत्रण!

MH13 NEWS NETWORK :

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केलेली टीका त्यांच्या समर्थकांच्या चांगलीच जिव्हारी लागली असल्याचं दिसून येत आहे.

‘विजयसिंह मोहिते पाटील समर्थक’ पेजवरून रूपाली चाकणकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.’विजयदादा राष्ट्रवादीला नको होते  तर पक्षाने त्यांच्यावर आजतागायत का कारवाई केली नाही?’ असा सवाल समर्थकांनी फेसबुकच्या पेजवरून विचारला आहे. दोन दिवसांपुर्वी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या कार्यक्रमात शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर यासंबंधाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘आपण इतर पक्षात गेलेलो नाही, इथेच आहोत‘ असे उत्तर मोहिते पाटील यांनी दिले होते. त्यावर ‘जिकडे भेळ तिकडे मोहिते पाटलांचा खेळ’ अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती. त्यावर मोहिते पाटील यांच्याकडून कुणी प्रतिक्रिया नोंदवली नाही, मात्र आज ‘विजयसिंह मोहिते पाटील समर्थक’ पेजवरून उत्तर देण्यात आले आहे.

हीच फेसबुक पोस्ट जशी आहे तशी…

दादा राष्ट्रवादीला नकोसे तर पक्षाने त्यांच्यावर आजतागायत का कारवाई केली नाही? स्वतः पवार साहेबांनी व जयंत पाटील साहेबांनी २ महिन्याखाली झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील जन्मशताब्दी कार्यक्रमात विजयदादांना पक्षात सक्रिय होण्याचा आग्रह केला; मात्र दादांनी विनम्रपणे सक्रिय होण्यास नकार दिला. पण त्याचसोबत हे हि सांगितले की, “मी ज्या पक्षाच्या स्थापनेत व उभारणीत हातभार लावला त्याच पक्षात राहीन.” सहकारी साखर संघ व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. तेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पाहिले अध्यक्ष होते. आज ज्या जागेवर इन्स्टिट्यूट आहे ती मांजरीची जमीन त्यांनीच पाठपुरावा करून शासनाकडून घेतली आहे. आणि विजयदादा त्या संस्थेच्या गवर्निंग कौन्सिलचे म्हणजेच संचालक मंडळाचे आजन्म संचालक आहेत.

रुपालीताई, आपणास सन्मानपूर्वक आग्रहाचं निमंत्रण..
अकलूजच्या लावणी महोत्सवाचा कार्यक्रम बघण्यासाठी व प्रसिद्ध भेळ खाण्यासाठी..!!

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago