रोटरी क्लब शहरात ६०० झाडे लावणार

नूतन अध्यक्ष सुनील तोष्णीवाल यांची माहिती

0
78

By-MH13NEWS,नेटवर्क

सोलापूर, दि. २२- रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट येत्या वर्षभरात शहर आणि परिसरात सहाशे झाडे लावणार आहे, असे नूतन अध्यक्ष सुनील तोष्णीवाल यांनी सांगितले.

श्री. तोष्णीवाल यांनी नुकताच श्री. वैभव होमकर यांच्याकडून रोटरी च्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री. सुनील अग्रवाल यांनी मनोज चव्हाण यांच्या कडून सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.

श्री. तोष्णीवाल यांनी सांगितले की, सोलापूर शहर आणि परिसरात झाडे लावण्याची आवश्यकता आहे. राज्य शासनाने तेहतीस कोटी झाडे लावण्याची मोहीम आखली आहे. रोटरी क्लब या मोहिमेत आपले योगदान देऊ इच्छित आहे. यासाठी रोटरी क्लब महानगरपालिका आणि विभागाला सहाय्याने काम करेल.

यावेळी डॉ. ओम मोतीपावले, डॉ. गौरी कहाते, मोहन देशपांडे, डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. संजय मंठाळे, लक्ष्मीनारायण शेराल, डॉ. नवनीत तोष्णीवाल, शैलेंद्र सुराणा, श्रीकांत बाहेती आदी उपस्थित होते.
श्रीमती आरती बंडी यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील अग्रवाल यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here