Categories: सामाजिक

‘रोहन’चा वाढदिवस ठरला आरोग्यदायी ; प्रतिबंधित क्षेत्रात केली अशी मदत

मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रतिबंधित क्षेत्रात आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॕथीक गोळ्यांचे मोफत वाटप केल्याने मुलगा रोहन याचा वाढदिवस आरोग्यदायी ठरला आहे.सामजिक कार्यकर्ते व विशेष पोलिस अधिकारी अर्थात SPO (Special Police Officer ) तुकाराम चाबुकस्वार यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबवला आहे.

जगभरात कोरोना सारख्या महामारीने हाहाकार माजवला आहे तोच महामारी आशा नगर येथील हद्दवाढ भागातील शिवशरण नगर या कामगार वस्तीत देखील शिरला आहे, गेल्या काही दिवसापासून ह्या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे हे जाणून घेऊन,
तिथे आणखी रुग्ण वाढू नये म्हणून तिथल्या गरीब नागरिकांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या “आर्सेनिक अल्बम 30” या होमीओपॕथीक गोळ्या उपलब्ध व्हावे म्हणून सामजिक कार्यकर्ते व विशेष पोलिस अधिकारी अर्थात SPO (Special Police Officer ) तुकाराम चाबुकस्वार यांनी स्वखर्चाने स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाच्या अतिरिक्त खर्च टाळून तिथल्या नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. हा निर्णय घेऊन तुकाराम चाबुकस्वार यांनी एक वेगळा आदर्श ठेवून आणि स्वतःच्या मुलाच्या वाढदिवस सत्कारयी लावले.

ह्या गोळ्या कोरोनाच्या नसून प्रत्येक नागरिकांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ह्या गोळ्या उपयुक्त आहेत.

⭕सकाळी दोन व संध्याकाळी दोन गोळ्या असे तीन दिवस या गोळ्या घ्यायच्या आहेत.

⭕बीपी,शुगर किव्हा इतर कुठलाही आजार असणाऱ्यांनी देखील ह्या गोळ्या घेऊ शकतात.

⭕या तीन दिवसांमध्ये कच्चे कांदे, कच्चे लसूण व कॉफी अशा पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

⭕गोळ्यांचे सेवन करताना त्या गोळ्यांना स्पर्श करु नये.
अशी माहिती नागरिकांना देण्यात आली

तुकाराम चाबुकस्वार

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

1 min ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

14 mins ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

10 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

19 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

20 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

21 hours ago