Categories: गुन्हे

थरारक : पोलिस व दरोडेखोरांमध्ये चकमक ; ३ पोलीस जखमी तर दरोडेखोर ठार

By- MH13 NEWS,वेब/टीम

रविवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या दरम्यान सोलापूर शहराजवळील उळे गावाजवळच गस्त घालताना पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. त्यानंतर एका दरोडेखोरला पकडून गाडीत घालत असताना तो दरोडेखोर पोलिसांना साहेब चुकले चुकले म्हणत असताना त्याने त्याच्या हातातील तलवारीने पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये पाटील हे जखमी झाले. पोलीस अधिकारी पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला. दरोडेखोर गोळीबारामध्ये जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला आहे.
उळेगावात पोलीस दरोडेखोरात धुमचक्री झाल्याने सोलापूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीसांच्या स्वसंरक्षणात केलेल्या फायरींग मध्ये एक दरोडेखोर गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात मरण पावला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

खाजगी कार मध्ये डिझेल ने भरलेलं बॅरल.!

घटनास्थळी सकाळी दोन कार आढळल्या असून यातील एका गाडीचा क्रमांक Mh-13 AZ / 1798 असा आहे. एका गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत.तर एका कार मध्ये डिझेल ने भरलेलं 5 ते 6 बॅरेल आढळून आले आहेत.  त्यामुळे घटनेला वेगळं वळण लागणार आहे. डिझेल चोरांची टोळी की गाव लुटण्यासाठी आलेलं दरोडेखोरांचं टोळकं याची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. मात्र या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

4 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

15 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

16 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

18 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

20 hours ago