Categories: गुन्हे

पाच आडत दुकाने फोडून २ लाखाचा ऐवज लंपास

By- MH13 NEWS,वेब/टीम

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाच आडत दुकानावर दरोडा टाकून १ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. या भागात दरोड्याचे सत्र सुरुच असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रविवारी दि.१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते सोमवार सकाळी ७.१५ वाजण्याच्या कालावधीत मल्लिनाथ येगदी यांच्यासह चंद्रकांत बबलाद, शिवानंद हौदे, बसण्णा हौदे, शरणप्पा मगी, परमेश्वर हौदे, शांतमल खंडाळ यांचे पाचही आडत दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून रोख रक्कमेसह धान्य चोरून नेले.असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्यात नोंद आहे.

विशेष म्हणजे या घटनेच्या आधी उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहिटणे, सलगर येथे गेल्या दोन दिवसापूर्वीच दरोडा पडलेला होता. त्यानंतर लगेच दुधनी येथील पाच आडत दुकानांवर दरोडा पडलेला आहे. दुधनी येथे मोठी बाजार पेठ असताना सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नाही.यामुळे व्यापार्‍यांतून भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

10 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

13 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

23 hours ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago