“गेट वे ऑफ इंडिया”च्या सुशोभिकरणाचा आढावा तयार.!

मुंबई, दि. 7 : गेट वे ऑफ इंडिया च्या सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा अहवाल महापालिका आयुक्त व वास्तुविशारद तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने लवकर सादर करण्याचे निर्देश राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज येथे दिले

राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरणासाठी राजभवन येथे बैठक झाली. त्यावेळी श्री.राव बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिंदाल फाऊंडेशनच्या संगीता जिंदाल, वास्तुविशारद प्रिती सांघी, वास्तुविशारद आभा नारायण लांबा, स्टोन डॉक्टर्स संस्थेचे हार्वेश मारवा व पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.राव म्हणाले, गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तुची स्वच्छता, परिरक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महापालिका आयुक्त व वास्तुविशारद तज्ज्ञ यांनी मुंबईतील इतर हेरिटेज वास्तुप्रमाणे गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरणाचा अहवाल लवकर सादर करावा.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासन राज्यातील हेरिटेज वास्तुचे संरक्षण व जतन करीत असून हे करताना वास्तू आहे त्या स्थितीत ठेवून त्याचे सुशोभिकरणही केले जाईल.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु,…

8 hours ago

सोलापूर- पुणे हायवेवर विचित्र अपघात : तिघांचा मृत्यू, चौघे जखमी

BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माढा तालुक्‍यातील अरण येथे रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अपघात झाला. या…

9 hours ago

चहावाला पंतप्रधान होतो तर चहापानावर बहिष्कार का? – मुख्यमंत्री ठाकरे. वाचा ठाकरेशैली…

MH13 NEWS Network: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला कोपरखळी मारली. पत्रकार परिषदेतील…

10 hours ago

अजून किती बळी ? मार्केटयार्ड सर्व्हिस रोडवर जड वाहनाचं पार्किंग

BY MH13 NEWS NETWORK :  सोलापूर मार्केट यार्ड मधील सर्व मोठी वाहने रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर 24 तास उभे करत असल्याचे दिसून…

11 hours ago

राजन पाटील यांच्यावर अधिवेशनानंतर येणार नवी जबाबदारी!

MH13 NEWS Network: विधानसभा निवडणुक रणधुमाळीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये…

12 hours ago

पुरुष गट राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा…

BY MH13 NEWS NETWORK : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित वरिष्ठ गट पुरूष आंतर जिल्हा स्पर्धा या दी. १२ ते…

13 hours ago