रामकृष्ण फाउंडेशनच्या वतीने सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत

0
38

 by-MH13News,network 

सोलापुरातील रामकृष्ण फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरातील गरजू पूरग्रस्तांना मदत देण्यात आली.
यावेळी पूरग्रस्तांना अन्नधान्य, जिवनोपयोगी वस्तू व नवे जुने कपडे देण्यात आले. ह्या नैसर्गिक आपत्तीत सोलापूरसह राज्य भरातुन विविध संस्थांकडुन मदतीचा ओघ सुरू आहे.सोलापूरकर मदतीसाठी सज्ज झाले आहेत.
यावेळी रामकृष्ण फाउंडेशनचे अध्यक्षा डॉ. उमा पवार (नेत्र तज्ञ) , उपाध्यक्षा वैशाली वाले, सचिवा स्वप्नीका बायस यांनी वरील सर्व वस्तू आतिश शिरसट व विजय जाधव यांच्याकडे पूरग्रस्तांना पोहोचवण्यासाठी दिले.
या कार्यासाठी डॉ.सिध्दार्थ पवार (रेटीना सर्जन), विवेक वाले व नयनसिंह बायस यांनी साह्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here