एका ‘कॉल’ने केला असा कायापालट ;सव्वा एकरात डाळिंबाचे 20 टन भरघोस उत्पादन… वाचा सविस्तर

MH13 News Network

सोलापूर जिल्ह्यातील मानेवाडी येथील शेतकरी सिध्देश्वर मेटकरी यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी चर्चेतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे सव्वा एकरात डाळिंबाचे मिळाले 20 टन भरघोस उत्पादन मिळाले.त्यांनी केलेल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी सेवेचा सिध्देश्वर मेटकरी यांना मोठा फायदा झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील डाळींबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.पण डाळींबाची शेती करत असताना शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूकपणे मार्गदर्शन मिळत नाही.त्यामुळे डाळींबा पिकापासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकरी सिध्देश्वर मेटकरी यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या डाळींब फळबाग विषयी भ्रमणध्वनी चर्चेत सहभाग घेतला.या चर्चेत सिध्देश्वर मेटकरी यांनी डाळींबाचे अचूक तंत्रज्ञान आत्मसात केले. त्याना या मोबाईलद्वारे आडिओ कॉन्फरंसचा फायदा झाला. सिध्देश्वर मेटकरी यांना सव्वा एकरात पूर्वी 8 ते 10 टन डाळींबाचे उत्पादन मिळत होते. मेटकरी यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी चर्चेतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे सव्वा एकरात डाळिंबाची दुप्पट म्हणजे 20 टन विक्रमी उत्पादन मिळाले आहे.

सिध्देश्वर मेटकरी यांची सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे सव्वा एकरात सात वर्षांपूर्वीची डाळींबाची जुनी बाग आहे. सव्वा एकरात 500 डाळींबाची झाडे आहेत. सिध्देश्वर मेटकरी कुटुंबातील इतर सदस्यांच्या सहकार्याने सव्वा एकरात डाळींबाचे पीक घेतात. डाळींबाची शेती करत असताना सिध्देश्वर मेटकरी यांना योग्य वेळी अचूक अशी माहिती मिळत नव्हती. रासायनिक खतांचा व औषधांचा वापर करुन सुध्दा उत्पन्न जास्त मिळत नव्हते. रोग व किडींचा खुप प्रभाव होता. मुळकुज, रोपे मरणे, फुळ व फळ गळ होणे या समस्या होत्या. पुर्वी सव्वा एकर मध्ये ७ ते १० टन उत्पन्न मिळत होते. सिध्देश्वर मेटकरी यांचा मोबाईल खराब झाल्यामुळे मित्राच्या मोबाईलद्वारे आडिओ कॉन्फरंसमध्ये सहभागी झाले होते. मित्राला समस्या विचारण्यास सांगितेले. सिध्देश्वर मेटकरी यांनी संपुर्ण कॉन्फरंस ऐकुन मिळालेल्या सल्याच्या योग्य वापर शेतीमध्ये केला. कॉन्फरंस मुळे खत, किड, रोग, पाणी व्यवस्थापन याविषयीचे नियोजन करता आले व खर्चात सुध्दा बचत झाली.सिध्देश्वर मेटकरी त्यांना कष्ट व उत्पादन खर्च आधारित उत्पादन मिळत नव्हते. त्यामुळे ते निराश होते. त्यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या डाळींबाची फळबाग लागवड कशी करावी मित्राच्या मोबाईल वरून या भ्रमणध्वनी चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेत त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.1) डाळिंब फळामद्धे मध्ये कुजावा हा रोग येतो आहे यासाठी काय करावे? 2) डाळिंब पिकावरती तेल्या रोग पडत आहे यासाठी काय करावे ?3)डाळिंब पिकाला मर लागते आहे यासाठी काय करावे? असे सिध्देश्वर मेटकरी यांनी प्रश्न विचारले.या भ्रमणध्वनी चर्चा सत्रात डाळींबाच्या फळबाग तज्ञांनी सिध्देश्वर मेटकरी यांच्या प्रश्नांचे निरसन केले.तज्ञांनी सिध्देश्वर मेटकरी यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.सिध्देश्वर यांना कार्य्रक्रमातील माहिती मुळे डाळींबा बागेचे योग्य नियोजन करता आले .त्यामुळे त्यांना फायदा झाला. तसेच दरवर्षी सरासरी झाडे किड व रोगामुळे मरत होती परंतु योग्य सल्ला मिळाल्यमुळे झाडांची मर थांबली.
प्रती झाड भरघोस उत्पन्न मिळाले.प्रती वर्षी होणारे एकरी नुकसान सुध्दा वाचले. रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात येण्यापूर्वी सिध्देश्वर मेटकरी यांना सव्वा एकरात पूर्वी डाळींबाचे उत्पादन- 8 ते 10 टन उत्पादन मिळाले होते.पण रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी चर्चासत्रात डाळिंब पिकाच्या लागवडीची तंत्रज्ञान माहितीमुळे सिध्देश्वर मेटकरी यांना आत्ताचे सव्वा एकरात 20 टन म्हणजे दुप्पट विक्रमी असे डाळींबाचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी पेक्षा सिध्देश्वर मेटकरी यांना जास्त नफा मिळाला आहे. फळास सरासरी ८० हजार रु प्रती टन दर मिळाला व २० टनाचे १६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. मागील ४ ते ५ वर्ष एकरी उत्पादन खुप कमी मिळत होते व मिळणारे उत्पन्न सुध्दा खुप कमी होते. रिलायन्स फाऊंडेशन व कृषी विज्ञान केंद्र, सोलापुर यांच्या सहकार्याने समस्यांचे निराकरण झाले व सिध्देश्वर मेटकरी यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली.रिलायन्स फाऊंडेशनच्या डाळींबाची शेती विषयक भ्रमणध्वनी चर्चेतून मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे पूर्वीपेक्षा डाळिंबाचे अधिक उत्पादन मिळाले आणि नफा जास्त झाल्याचे सिध्देश्वर मेटकरी यांनी यावेळी सांगितले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आदेश | रात्र संचारबंदी वाढली ; 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खेळाचे सामने,यात्रा…वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सोलापुर जिल्ह्यात…

10 hours ago

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय ‘लोक अदालत’

MH13NEWS Network महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक…

12 hours ago

वटवृक्ष देवस्थान म्हणजे मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – जाधव

MH13NEWS Network एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते.…

14 hours ago

महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी: काल उपळाई (बु) येथील शितोळे वस्तीच्या डिपीचे दुरूस्तीचे काम करत असताना…

2 days ago

सोलापुरातील ‘या’ 23 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी ; ग्रामस्थांना होणारे फायदे…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती             सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन…

3 days ago

मुळेगावात तरुणाचा खून ; १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरुणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या १२…

3 days ago