चला देऊ आता भाजप सरकारला लाथ ;राष्ट्रवादीचे आंदोलन 

0
12

By-एम एच१३न्यूज, वेबटीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर असताना इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित करण्यात येणाऱ्या जाहीर सभेपूर्वी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शिवाजी चौकात छत्रपतींचा आशीर्वाद ; चला देऊ आता भाजप सरकारला लाथ असे आगळेवेगळे आंदोलन करून मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा निषेध केला. शहराध्यक्ष भारत जाधव,कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी लवकर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना काही मिनिटातच पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे मुखवटे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी हवेत बबल्स सोडून मोदी यांच्या फसव्या घोषनांची खिल्ली उडविली. मोदी पुन्हा आले हवेतले फुगे सोडायला असे सांगत निषेधाच्या घोषणा दिल्या.

वर्षाला दोन कोटी रोजगार,पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ,महिलांवरील अत्याचार थांबविणार , शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव,जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करणार,शिवस्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधणार,मराठा धनगर कोळी व लिंगायत धर्मास मान्यता आणि आरक्षण,सोलापूरचा विकास,पंढरपूर मंदिर विकास व चंद्रभागा नदी शुद्धीकरण , सोलापुरातील टेक्सटाईल उद्योगाला चालना, वृद्ध श्रमिक पत्रकारांना मासिक मानधन रुपये देण्याच्या घोषणांपैकी कोणत्याच घोषणा मोदी यांनी पूर्ण केल्या नसल्याबद्धल सामान्य नागरिकांमधून तीव्र संतप्त प्रतिक्रिया असल्यामुळे आज सोलापूरला आलेले पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केल्याची माहिती शहराध्यक्ष भारत जाधव,कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली. मोदी यांनी जसे हवेत घोषणा केल्या त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने सुद्धा हवेत बबल्स सोडून त्यांच्या सुमार कामगिरीचा निषेध केल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

यावेळी मनोहर सपाटे ,दिलीप कोल्हे, किसन जाधव,चंद्रकांत पवार, सुनीता रोटे, पद्माकर काळे , राजन जाधव, जुबेर बागवान, बशीर शेख,सुहास कदम , चेतन गायकवाड,लता ढेरे, मंगलाताई कोल्हे,गौरा कोरे,वंदना भिसे, उषा बेलसरे, छाया जगदाळे, निलोफर तांबोळी,राजश्री माशाळे , डॉ. दादाराव रोटे,महम्मद इंडीकर,निशांत सावळे , अमीर शेख , अनिकेत पवार,यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here