प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानप्राप्ती हा उद्देश ; मुख्याध्यापक आतकरे

राजीव प्राथमिक शाळा क्षेत्रभेट उत्साहात

0
6

(वेब/टीम)

केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष क्षेत्रभेट झाल्यास प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांच्या गाठीस येईल या जाणिवेतून राजीव प्राथमिक शाळेची क्षेत्रभेट जिल्ह्याचे मुख्य पोस्ट ऑफीस व डॉ. द्वारकानाथ कोटणीस वस्तुसंग्रहालय या ठिकाणी गेली होती. बुधवारी सकाळी इयत्ता तिसरीची विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सहल आयोजित केली होती.

विद्यार्थ्यांनी मुख्य पोस्ट ऑफीस येथे विविध प्रकारचे पत्रे यांची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस मधील विविध खात्यामधील कर्मचाऱ्यांची कामे पाहिली. साधे पत्र, आंतरदेशीय पत्र, विविध पाकिटे ,टपाल तिकिटे यांची माहिती मुलांना देण्यात आली. हि माहिती विपनन अधिकारी अतुल थळेकर यांनी दिली . एस.सी. शिरसी (प्रवर अधीक्षक) व जी. पी. दातार यांनी विद्यार्थ्यांशी हसतखेळत मुक्त संवाद साधून विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना पोस्टाच्या विविध योजनेची माहिती दिली. पोस्ट ऑफिसच्या वतीने चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

सोलापूरचे सुपुत्र डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे मुलांनी डॉ. कोटणीस यांच्या जीवनपटाची माहिती चित्राद्वारे व भित्ती पत्रकाद्वारे घेतली.
क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आतकरे, शिक्षक अब्दुलकादर मुजावर, धनंजय लिगाडे,राजश्री ढवण,ऊर्मिला साठे, सुवर्णा चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here