Categories: राजकीय

राजन पाटील यांच्यावर अधिवेशनानंतर येणार नवी जबाबदारी!

MH13 NEWS Network:

विधानसभा निवडणुक रणधुमाळीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्ष स्थापनेपासून सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आमदार दिलीप सोपल, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, रश्मी बागल या मातब्बर नेत्यांनी पक्ष सोडला अशावेळी एकटे पडलेल्या शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यास कार्यकर्त्यांची पुन्हा मोळी बांधून गर्दी जमवण्याची जबाबदारी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर आली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्वमान्य उमेदवार देऊन जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याची जबाबदारी यावेळी राजन पाटील यांच्यावर सोपवण्यात आल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

संपूर्ण जिल्ह्यात चांगला जनसंपर्क ठेवत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील या दोन्ही मुलांच्या माध्यमातून त्यांना हि किमया करण्यात त्यांना यश आले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला व शरद पवार यांना तरुणांचा मिळालेला प्रचंड सहभाग व प्रतिसाद पाहता या बदलाची खरी बीजे सोलापूर मधील कार्यकर्ता मेळाव्यातच पेरली होती असे अनेक राजकीय जाणकार म्हणतात. विधानसभा प्रचारावेळी शरद पवार यांचा मोहोळ येथे भव्य नागरी सत्कार करण्याचा मानस माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केला होता. या नागरी सत्काराचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी आज पवार यांची मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासोबत भेट घेतली. शरद पवार यांनी या सत्कारास अधिवेशनानंतरची तारीख दिल्याचे समजते, याबरोबरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्वमान्य उमेदवार देऊन जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याची जबाबदारी यावेळी राजन पाटील यांच्यावर सोपवण्यात आल्याचे समजते.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेले सर्व सदस्य अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी सोबतच राहतील याचा मला विश्‍वास आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अध्यक्ष निवडीसाठी आम्ही पक्षाच्यावतीने व्हिप बजावला जाईल. मोहोळमधील नागरी सत्कारासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येणार आहेत.
– माजी आमदार राजन पाटील

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

2 hours ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago