Categories: आरोग्य

रघोजी किडनी & मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आज शुभारंभ

प्रतिनिधी/सोलापूर, दि. १७ येथील रघोजी किडनी अॅन्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ आज रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. होत आहे. या उद्घाटन सोहळ्यास देश-विशात प्रसिध्द असलेले बॉम्बे हॉस्पिटल येथील मूत्ररोग तज्ञ डॉ. प्रशांत पटनाईक, मिरज येथील
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संभाजी वाघ व मुंबई येथील प्रसिध्द लॅप्रोस्कोपी तज्ञ डॉ.नागेंद्र सरदेशपांडे हे या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोलापूर हे मेडिकल हब बनत असून यामध्ये रघोजी हॉस्पिटलचा मोठा वाटा असणार आहे.


होटगी रोड, मोहिते नगर येथे सुमारे अर्धा एकर जागेवर हे नवे पाच मजली आधुनिक हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. येथे मुत्ररोग व इतर रोगांवर इलाज उपलब्ध असणार आहेत. भारतातील अनेक नामवंत रुग्णालयाच्या धर्तिवर या हॉस्पिटलचे डिझाईन करण्यात आले असून हॉस्पिटलचे आर्किटेक्ट शशिकिरण शाह असून बांधकाम प्रमुख म्हणून जावीद शेख व इंटिरिअर डिझायनर म्हणून निरव मेहता यांनी कार्य केले आहे.
या हॉस्पिटलमध्ये ३ मोड्युलर ऑपरेशन थिएटर, डॉनियर सिग्मा लिथोट्रिप्सी.थुलियम लेसर थेरपी, होलमियम याग लेसर, सीटी स्कॅन डिजीटल एक्सरे, १० बेडचे आयसीयु, १२ बेडचे डायलेसीस युनिट, सेंट्रल ऑक्सिजन, प्रशस्त सुपर डिलक्स, सेमी डिलक्स रुम्स, ६ जनरल वॉर्डस्, २४ तास मेडिकल आदी सुविधा येथे उपलब्ध असल्याचे डॉ. संध्या रघोजी यांनी सांगितले.

लिलावती हॉस्पिटल, मुंबई येथून डीएनबी पदवी घेतलेले डॉ.नवनाथ फुलारी यांचा किडनी ट्रान्सप्लांट करण्यात विशेष हातखंडा आहे. डॉ. गजानन पिलगुलवार यांनी एमडी आणि डीएम नेफ्रोलॉजी केले असून ते याा हॉस्पिटलमध्ये डायलेसिस विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करणार आहेत. डॉ. निहारिका रघोजी-पिलगुलवार या एम.एस. स्त्रीरोग तज्ञ असून लॅप्रोस्कोपीमध्ये विशेष प्राविण्य घेतले आहे. याशिवाय डॉ. आशित मेहता, डॉ. शैलेश पटणे, डॉ. रुचा शाह व डॉ. संगमेश्वर पाटील हे विविध विभाग सांभाळणार आहेत. मेडिकल
प्रॅक्टिसचे ३५ वर्ष अनुभव असणारे डॉ. श्रीराम पिलगुलवार हे वैद्यकिय व्यवस्थापक म्हणून कार्य बघणार आहेत तर पत्नी डॉ.संध्या रघोजी या नेत्रविकार तज्ञ म्हणून सेवा देणार आहेत.
रघोजी किडनी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे केंद्र सरकार व राज्य सरकार मान्यताप्राप्त हॉस्पिटल असून येथे महात्मा ज्योतीबा फुले सह वाजपेयी आरोग्य योजना व इतर अनेक इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस ट्रीटमेंटेसाठी मान्यताप्राप्त आहे, असेही डॉ. रघोजी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सोलापूरातील पहिले मुत्ररोग तज्ञ अशी डॉ. विजय रघोजी यांची ओळख

डॉ. विजय रघोजी हे सोलापूर शहरात गेली ३७ वर्षांहून अधिक वैद्यकिय सेवा देत असून सोलापूरातील पहिले मुत्ररोग तज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाली आहेत. देशात व परदेशात आयोजित किडनी विषयक परिषदेत
त्यांनी विविध सत्रांचे अध्यक्षपद भुषविले आहे.
त्यांनी जर्मनी येथे लिथोट्रिप्सी विषयक प्रशिक्षण घेतले असून पश्चिम विभागीय युरालॉजी परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते येथील अश्विनी सहकारी
रुग्णालयाच्या संचालकपदावर ही कार्यरत आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago