येत्या ५ वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद ; महाराष्ट्राला मिळणार मोठा वाटा – नरेंद्र मोदी

मुंबई मेट्रोच्या तीन मार्गिका, मेट्रो भवनचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन; मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण

मुंबई, दि. 7 : 21 व्या शतकात आवश्यक असणाऱ्या दळणवळण (Mobility), संपर्क (Connectivity), उत्पादकता (Productivity), शाश्वतता (Sustainability) आणि सुरक्षा (Safety) याला प्राधान्य देत आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या 5 वर्षात देशात पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातील मोठा वाटा महाराष्ट्राला मिळेल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

बांद्रा कुर्ला संकुलातील कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रो मार्ग 10, 11 आणि 12या तीन मेट्रो मार्गिकांचे तसेच मेट्रो भवनचे भूमिपूजन, मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण, बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन रिमोटद्वारे करण्यात आले. यावेळी महामुंबई मेट्रोच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,विपरीत परिस्थितीत यश कसे मिळवायचे हे आपण सर्वांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून शिकले पाहिजे. खरे तर कोणतेही लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करणारे तीन प्रकारचे लोक असतात. पहिले जे काम सुरूच करत नाहीत. दुसरे काम सुरू करतात पण अडचण आल्यावर काम सोडून पळतात तर तिसऱ्या प्रकारचे लोक लक्ष्य गाठण्यासाठी निरंतर प्रयत्न करतात. इस्त्रोचे शास्त्रज्ञ हे तिसऱ्या प्रकारात येत असल्याने मला विश्वास आहे की चंद्रावर पोहचण्याचे आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

श्री. मोदी म्हणाले, भारतात जवळपास 30 ते 35 वर्षांपूर्वी पहिली मेट्रो सुरु झाली. त्यानंतर2014 नंतर आज देशभरात 27शहरात मेट्रोची कामे सुरु आहेत. यामध्ये जवळपास 675 किमी अंतर या मेट्रोमध्ये येणार असून 400किमी प्रवासाचा टप्पा गेल्या 5 वर्षात सुरु झाला आहे. 21 व्या शतकात एक भारत – श्रेष्ठ भारत असे आपण म्हणतो, त्यावेळी दळणवळणासाठी एक राष्ट्र एक संपर्क यंत्रणा’ तयार होणे आवश्यक आहे. मुंबईमुळे देशालासुद्धा गती मिळते. मुंबईत पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कामे होत आहेत. या सगळ्या योजनांमुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येईल.

मुंबईत होत असलेल्या मेट्रोमुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येणारच आहे, त्याशिवाय या सेवेमुळे जवळपास 10 हजार इंजिनिअर्स आणि 40 हजार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे जवळपास50 हजार रोजगार यामुळे मिळणार आहे. मुंबईत होत असलेल्या नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे जलद वाहतूक सेवा आणि रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.

आपल्या भाषणातही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी उपस्थिताना गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या परंपरेची गाथा देशविदेशातही गौरविली जात आहे. मुंबई व महाराष्ट्रातील लोकांची साथ मला नेहमीच प्रोत्साहित करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदूषणमुक्तीचा संकल्प करा

सध्या गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा होत आहे. पण यानिमित्ताने आपण सर्वांनी ‘एक देश, एक संकल्प’करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. गणपती विसर्जन काळात मोठ्या प्रमाणात कचरा समुद्रात टाकला जातो आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यावेळी आपण सर्वांनी संकल्प करुया की, प्लॅास्टिक, कचरा समुद्रात आणि मिठी नदीत टाकणार नाही.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

2 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

13 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

18 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

22 hours ago