अभिमानास्पद बातमी : नागेश करजगी ऑर्किड स्कूलने साधली आंतरराष्ट्रीय पुरस्काराची हॅटट्रिक.!

कुमारदादा करजगी यांचा ‘भारत विद्यारत्न' पुरस्काराने गौरव !

0
7

By-MH13NEWS,नेटवर्क

सोलापूरच्या शैक्षणिक वर्तुळात आदर्शवत ठरलेल्या व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी वाटचाल करणा-या नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे संस्थापक अध्यक्ष
कुमारदादा करजगी यांना शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिल च्या वतीने ‘भारत विद्यारत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दि. ४ एप्रिल रोजी दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात कुमारदादा करजगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारामुळे स्कूलने आंतरराष्ट्रीय पुरस्काराची हॅटट्रिक साधली.इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिल ही भारतातील नामांकित संस्था आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.

गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापूरात अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कुमारदादा करजगी यांना हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकता आले नाही, याची खंत
मनात ठेऊन त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञानसंकुल उभे करून सोलापूरातील असंख्य विद्यार्थ्यांना घडविण्याचा वसा घेऊन शिक्षणक्षेत्रात कार्य करत आहेत.
सोलापूरात नागेश करजगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
अल्पावधीतच श्री. कुमार दादांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले असून आज त्यांच्या ज्ञानसंकुलातून असंख्य विद्यार्थी आंतराष्ट्रीष्ठ दर्जाचे शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. केजी टू पीजी ही संकल्पना प्रत्यक्षात त्यांनी आदर्शरित्या अंमलात आणली आहे.या अगोदर कोलकाता येथे झालेल्या जागतिक शैक्षणिक परिषदेमध्ये तीन आंतरराष्ट्रीय
पुरस्कारांनी स्कूलला गौरविण्यात आले आहे. यात अनुक्रमे ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करणारी सर्वोत्कृष्ट शाळा’, ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख, पूर्व प्राथमिक शाळा’ तसेच ‘सर्वोत्कृष्ट
उपक्रमशील शाळा’ या पुरस्कारांचा समावेश होता.
तसेच नवी दिल्ली येथे इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिल यांचा आंतरराष्ट्रीय डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम एज्युकेशन एक्सलंस अवॉर्ड देऊनही स्कूलला गौरविण्यात आले आहे.
सन २०१२ साली स्थापन झालेल्या नागेश करजगी ऑर्किड स्कूलने दमदार शैक्षणिक कार्य करत सोलापूरातील असंख्य संस्था व संस्थाचालकासमोर आदर्श निर्माण केला आहे.
स्कूल मध्ये प्रवेश घेतेवेळी कोणत्याच प्रकारचे डोनेशन आकारले जात नाही. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी दिली जाते. महाराष्ट्रात
सर्वप्रथम १:१ ई-लर्निंग लॅब सुरु करण्याचा बहुमान स्कूलला मिळाला आहे. आपल्या स्कूल बरोबरच महानगरपालिका शाळा नं. ५ मध्ये श्री. कुमार दादांनी अद्ययावत संगणकीकृत
डिजिटल बोर्ड व प्रोजेक्टर भेट म्हणून दिले आहेत.
दर्जेदार शिक्षण, मूलभूत सोईसुविधा, विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राबवण्यात येत असलेले शालेय व शालेयतर उपक्रम यामुळेच अल्पावधीत स्कूलचा नावलौकिक
सर्वदूर पसरला आहे.महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात राज्याच्या मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत तसेच जागतिक
शिक्षणतज्ञ, शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटक संस्थेला भेट देऊन त्यांचा भाग होण्याचा प्रयत्न करत आहे.
तिसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेतल्यानंतर श्री. कुमार (दादा) करजगी म्हणाले की, हा पुरस्कार प्रेरणा देणारा व शैक्षणिक कार्याला गती देणारा आहे. हा बहुमान केवळ माझा व
स्कूलचा नसून संपूर्ण सोलापूरकरांचा बहुमान असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

काळाच्या पडद्याआड गेलेला एकुलता एक मुलगा कै. नागेश यांच्या नावे शाळेची सुरुवात केली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये मी माझ्या मुलाला पाहतो. जगाशी स्पर्धा करणारा विद्यार्थी घडविण्याचा वसा घेतला असून, मुंबई, पुण्याच्या धर्तीवर सोलापूरात
आंतरराष्ट्रीय ज्ञानसंकुल उभे केले आहे.
कुमार दादा करजगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here