‘बसवण्णा’च्या वचनात भारतीय संविधान तत्वे – मंजुनाथ कक्कळमेली

MH13 NEWS Network

१२व्या शतकात रूढी परंपरेने ग्रासलेल्या समाजात क्रांती आणणारे महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्यात भारतीय संविधानाची तत्वे आहेत,’ असे प्रतिपादन ऍड. मंजुनाथ कक्कळमेली केले.बसव जयंती निमित्त फेसबुक लाईव्ह माध्यमातून ‘महात्मा बसवेश्वर- लोकशाही मूल्ये व भारतीय संविधान,’ ह्या विषयावर ते बोलत होते.

ऍड. कक्कळमेली म्हणाले की,लोकशाही पद्धतीची संकल्पना जगात अगोदर ग्रीस मध्ये मांडली असली तरी जगाला संसदीय पद्धतीची लोकशाही संकल्पना हे जगात सर्वात प्रथम १२व्या शतकात लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटप स्थापन करून केली आहे.

आजच्या लोकशाही संसदीय पद्धतीत व अनुभव मंटप एकच फरक म्हणजे अनुभव मंटप शरण व शरणी यांची जात धर्म ,स्त्री ,पुरुष असे भेदभाव न करता , निवड ही विद्वत्तेवर सर्वानुमते मंटपचे अध्यक्ष अल्लमप्रभू करायचे.

आज संसदेमध्ये जसे एखादी कायदा वा कायदे मधील सुधारणा आणताना चर्चा होते त्याप्रमाणे १२व्या शतकात अनुभव मंटप मध्ये वचन ला मान्यता देताना चर्चा व्हायची व मान्यता दिली जात असे.
भारतीय संविधान हे मूल्यांवर आधारित आहे. गौतम बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांनी सांगितलेली मूल्ये चिरंतन आहेत. या मूल्यांचा समावेश भारतीय संविधानाचा सरनामा, मूलभूत हक्क व कर्तव्यात केला आहे. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. समाजातील जातीयता, विषमता, लिंगभेद यांना मूठमाती देऊन समतेचे तत्व अंगिकारले. ३५० जातींचा लिंगायत धर्मामध्ये समावेश आहे. १२ व्या शतकात बसवेश्वरांनी सामाजिक समतेचा संदेश देऊन प्रत्यक्षात समाजामध्ये आचरणात आणला.’

भारतीय संविधानातील कलम १४, १५ व १७ ते ५१ मधील तत्वे प्रत्येक व्यक्तीच्या मूलभत हक्कांशी संबंधित आहेत. मूलभूत हक्क व कर्तव्ये १२ शतकात बसवेश्वरांनी आपल्या साहित्यात मांडले आहेत. स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता ही शाश्वत मूल्ये दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातील १२ एप्रिल १९२९ च्या अंकात गौतम बुद्ध, महावीर यांच्यानंतर बसवेश्वरांच्या विचारांचा परामर्श घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी घटना लिहिताना भारतीय संस्कृतीतील ज्या महान विभूती होत्या त्यांच्या विचारांचा आधार घेतला आहे. बसवेश्वरांच्या साहित्याचा अभ्यास करताना असे लक्षात येते की भा​रतीय संविधान बसवेश्वराच्या वचन साहित्यात दडलेले दिसते.’आजही आपण सामाजात जातीभेद होताना पाहतो,

बसवेश्वर यांनी १२व्या शतकात लोकांमध्ये समाज क्रांती घडवत आंतरजातीय विवाह लावून दिले होते. बसव विचाराची आज ही गरज असून बसव वचन अंगीकारूनच समाज व मानव जातीचे उद्धार होणे शक्य आहे.
या उपक्रमास फेसबुक वरून भरपूर प्रतिसाद मिळाला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago