वाह | आंब्याची रोपे तयार करून मोफत देणारे कुटुंब.!

MH13 News Network

पापरी गावच्या शहा कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक उपक्रम

सोलापूर : पापरी येथील वृक्षप्रेमी सम्मेद शहा यांनी स्वत:च्या घराजवळ रोपवाटिका तयार करून लोकांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. पर्यावरण संवर्धनास हातभार लावणारा शहा कुटुंबीयांचा हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून उपक्रम अविरतपणे सुरु आहे. आतापर्यंत त्यांनी अडीच हजारपेक्षा जास्त रोपे मोफत दिली आहेत.

पापरी येथे शहा परिवाराची अकरा एकरची शेती आहे. काही वर्षांपूर्वी सम्मेद यांचे वडील राजकुमार शहा यांनी आपल्या शेतात आंब्याचे झाड लावले. झाड मोठे झाल्यावर ते आंब्याच्या फळांनी लगडून गेले.
झाडाला लागलेली फळे साखरे सारखी गोड आहेत. दरवर्षी झाडाला दोन अडीच हजार फळे हमखास येतात. या झाडाला लागलेली आंबे कुणालाही न विकता ते नातेवाईक आणि मित्र परिवारास वाटून टाकतात.

अशी आंब्याची गोड झाडे सर्वत्र असावी तसेच झाडे लावून पर्यावरण वाचावे, असा विचार शहा यांच्या मनात आला. त्यांनंतर त्यांनी आपल्या घरासमोर छोटीशी रोपवाटिका बनविण्याचा निर्णय घेतला. या रोपवाटिकेतून तयार झालेली रोपे ते शाळा, सामाजिक संस्था यांना मोफत देतात. घरी आंबे खाल्ले किंवा त्याचा आमरस काढल्यावर त्याच्या कोय टाकून न देता दरवर्षी त्याची पाचशेच्या वर रोपे तयार करतात.

वर्षभर सदर रोपे नातेवाईक, मित्र, राजकारणी व्यक्ती यांचा कुणाचा वाढदिवस अथवा कार्यक्रम असल्यास सदर रोपे भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करतात. पावसाळा सुरू झाला की, कागदी पिशव्यांमध्ये माती भरून कोयीचे रोपण केले जाते. ही रोपे बनवण्यासाठी शहा कुटुंबातील सर्व सदस्य मदत करत असतात. रोज नियमितपणे या रोपांना पाणी देणे आणि त्याची वाढ कशी होईल यासाठी निगा राखली जाते.

पर्यावरण संवर्धनास मदत
आम्ही आंब्याची रोपे तयार करुन वाटप करत असतो. यामुळे भविष्यात मोठे वृक्ष होवून पर्यावरण संवर्धनास हातभार लागेलच. शिवाय हजारो फळे त्यांस लागतील त्या पासूनही शेकडो झाडे बनतील. ज्यांना ज्यांना अगोदर रोपे दिली आहेत ते त्याची जोपासना  करत आहेत. या उपक्रमातून आम्हाला मोठे समाधान मिळते.
सम्मेद शहा, पापरी

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

19 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago