सोलापूर नागरी बँकेच्या थकबाकीदार यंत्रमागधारकांच्या कर्ज फेडीसाठी प्रणिती शिंदेंचा पुढाकार

जिल्हा यंत्रमाग कल्याणकारी संघटना व जिल्हा उपनिबंधक यांच्यासमवेत झाली बैठक

0
31

वैयक्तीक प्रस्ताव मान्यतेसाठी सहकार आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन

by -MH13News,network

सोलापूर : सोलापूर नागरी बँकेच्या थकबाकीदार यंत्रमाग धारकांना सहकारी कायदा नंबर १०१ अंतर्गत मालमत्ता जप्तीची नोटीस अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक , सोलापूर याच्या वतीने देण्यात आली होती .त्यामुळे यंत्रमाग धारक व थकबाकीदार यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते . त्या संदर्भात जिल्हा यंत्रमाग कल्याणकारी संघटनेच्या वतीने आ.प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते .त्यामुळे आ. शिंदे यांनी थकबाकीदार यंत्रमागधारकांच्या कर्ज फेडीसाठी पुढाकार घेतला.

आज मंगळवारी आ. शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक , सोलापूर व जिल्हा यंत्रमाग कल्याणकारी संघटना यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंत्रमाग पॅकेज लाभार्थी यंत्रमाग घटकांचे पुनर्वसन आदी योजना न राबविता उर्वरीत रकमेचे वसुली ची कार्यवाही अवसायकाने करित असल्याने ते थांबविण्याबाबतचेनिवेदन सादर करण्यात आले.यावर उत्तर देताना जिल्हा उपनिबंधकाने समोपचाराने प्रत्येक यंत्रमाग घटकाने वैयक्तीकरित्या प्रस्ताव सदर करण्याचे सांगितले . शासनाने पॅकेज अंतर्गत ५० टक्के अनुदान प्राप्त झालेली रक्कम सोडून उर्वरीत रक्कम मुददल भरण्याचे बैठकीत ठरले . तरी यंत्रमाग धारकांनी कर्जफेडीचे वैयक्तीक प्रस्ताव सादर अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दोन आठवडयात प्रस्ताव दाखल करण्याचे ठरले .

त्यानंतर सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी सहकार आयुक्त, पुणे यांच्याकडे सहकार कलम १०५ अंतर्गत मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन यावेळी जिल्हा उपनिबंधक यांनी दिले . तरी या संधीचा जास्तीत जास्त लाभ थकबाकीदार यंत्रमाग धारकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा यंत्रमाग कल्याणकारी संघटना व आ . प्रणिती शिंदे यांच्या वतीने करण्यात आले .


या बैठकीत आ. प्रणिती शिंदे यांच्या समवेत नागरी बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक. श्री . कुंदन भोळे यांच्या सह जिल्हा यंत्रमाग कल्याणकारी संघटनेच अध्यक्ष श्री. लक्ष्मीनारायण चिलका , श्रीरामलु बुर्ला , पांडुरंग यनगंटी , आनंद कंदीकटला , मलेशम येमुल, नरसय्या गरदास, तिरुपती परकीपंडला, मल्लिकार्जुन सिंगम, इतर थकबाकीदार यंत्रमाग धारक बहुसंख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here