Categories: राजकीय

विडी-यंत्रमाग उद्योगावर आलेल्या संकटावेळी तुम्ही कुठे होता ? प्रणिती शिंदे यांचा विरोधकांना सवाल

कुठलीही निवडणूक असो ती जिंकण्यासाठी आधी लोकांची कामे करावी लागतात. मी कामाच्या जोरावरच ही निवडणूक लढत आहे.  विधानसभा निवडणुकीत अनेक जण सर्कशीप्रमाणे इकडून तिकडे उड्या मारत शहर मध्य मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत, मात्र विडी-यंत्रमाग उद्योगावर आलेल्या संकटावेळी तुम्ही कुठे होता? असा सवाल कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवारी अशोक चौकातील नटराज मित्र मंडळाजवळ झालेल्या कॉर्नर बैठकीत विरोधकांना उद्देशून केला.
यावेळी दिलीप क्षीरसागर, सुरेखा क्षीरसागर, श्रीनिवास तोपूल, आनंद कंदीकटला, तिरुपती परकीपंडला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. प्रणितीताई पुढे म्हणाल्या की, अशोक चौक भागातील बिगरशेती जमीनीचा प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. या प्रश्‍नी मी सातत्याने पाठपुरावा केला. सध्या ते काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा निवडून द्या. पूर्व भागाविषयी मला आणखीन खूप काही करावयाचे आहे. ही कामे करण्याबरोबरच मी शेवटपर्यंत जनतेची साथ सोडणार नाही.

ही लढाई माझी एकटीची नसून सर्वांची आहे. गत दोन निवडणुकीत तुम्ही मला निवडून देऊन काम करण्याची संधी दिली. त्यामुळे जनतेशी माझे नाते निर्माण झाले आहे. हे नाते जर कोणी तोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते लोकांनी हाणून पाडावे. या निवडणुकीत काहीच काम नसलेले उमेदवार भावनिक आवाहन करुन तुम्हाला भुलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बळी पडल्यास तुमचेच नुकसान होणार आहे. तेव्हा कामाच्या मुद्यावर तुम्ही सलग तिसर्‍यांदा विजयी करुन पुनश्‍च सेवेची संधी द्यावे, असे आवाहन आ. प्रणितीताईंनी यावेळी केले.
बैठकीला नरहरी पडाल, राजू विडप, श्रीधर विडप, लक्ष्मीनरसू कंदीकटला, अंबादास येरनागे, माणिक गुडाळे, मुरली नुती आदी उपस्थित होते.
किसान संकुलातही बैठक अशोक चौकातील बैठकीनंतर आ. प्रणितीताईंनी अक्कलकोट रोडवरील किसान संकुलमध्येदेखील कॉर्नर बैठक घेतली. यावेळी माजी नगसेविका संजीवनी कुलकर्णी, वीणा देवकते, अप्पू बिराजदार, धोंडप्पा तोरगणी, अनिता बिराजदार, सुनीता बडुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना आ. प्रणितीताई म्हणाल्या की, हद्दवाढ भागातही  मी अनेक विकास कामे केली आहेत, मात्र आणखीन समस्या सोडवायच्या आहेत. तुम्ही कधीही सांगा मी तुमच्यासाठी अहोरात्र झटायला तयार आहे. तिसर्‍यांदा मला निवडून दिल्यास मी हद्दवाढ भागासाठी भरघोस कामे करुन लोकांची बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करेन.
बैठकीला एजाज बागवान, सोमनाथ धनुरे, सिद्धू गुजले, बसवराज कलशेट्टी, रमेश बिराजदार, गुरुनाथ हिरोळी, रमेश लिंबीतोटे आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago