Categories: सामाजिक

‘प्रकाशमय यात्रा’ फोटोग्राफी स्पर्धेच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण

सोलापूर : वीरशैव व्हीजन युवक आघाडीतर्फे प्रकाशमय यात्रा फोटोग्राफी स्पर्धेचे पुरस्कार वितरण रविवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेजवळील समृद्धी हॉटेल येथील सभागृहात होणार असल्याची माहिती स्पर्धाप्रमुख बसवराज जमखंडी यांनी दिली.
वीरशैव व्हिजनतर्फे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त प्रकाशमय यात्रा हा उपक्रम गतवर्षापासून राबविण्यात येत आहे. या प्रकाशमय यात्रेत गतवर्षापासून अनेक व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांनी छायाचित्रे काढतात. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा प्रथमच वीरशैव व्हीजन युवक आघाडीतर्फे फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कॅमेरा आणि मोबाईल अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांच्या हस्ते, नगरअभियंता संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली तर निसर्ग छायाचित्रकार डॉ. व्यंकटेश मेतन, आंतरराष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार विजेते शिवानंद हिरेमठ, सिनेमॅटोग्राफर आनंद झिंगाडे, आस्क मी हेल्पलाइनचे संचालक राहुल शेटे व वीरशैव व्हीजन उत्सव समितीचे अध्यक्ष सोमेश्वर याबाजी यांच्या उपस्थितीत होणार आहे
यावेळी अध्यक्ष विजयकुमार हेले, सोमनाथ चौधरी, शिव कलशेट्टी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, अविनाश हत्तरकी, अमोल कोटगोंडे, धानेश सावळगी, चेतन लिगाडे आदी उपस्थित होते

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

2 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

13 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

14 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

16 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

17 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

18 hours ago