प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर फेकले ऑईल

0
1

(वेब/टीम)

अपंगांचा निधी वेळेवर खर्च न केल्याच्या निषेधार्थ  प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर डिझेल आणि आॅईल फेकले. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, अजित कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी त्यांची संबंधित अधिकाऱ्यांची भेट घालून देण्याची तयारी केली होती. परंतु,  अचानकपणे काही कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करीत प्लास्टिक पिशवीत भरुन आणलेले डिझेल आणि आॅईल आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वासमोर फेकले. बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस व पालिका अधिकारी यांच्यावर ते ऑइल पडले.
याप्रकरणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष जमीर शेख यांच्यासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. आंदोलन करा मात्र महापालिका परिसराचे विद्रुपीकरण नको अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. महापालिका परिसराचे नुकसान होईल अशा चुकीच्या पद्धतीने केलेले आंदोलन निषेधार्ह असल्याची भावना कामगार नेते अशोक जानराव यांनी यावेळी व्यक्त केली.
या  प्रकरणी संबंधित आंदोलनकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here