शिवरायांच्या गड, किल्ल्यांना हात लावला तर प्रहारकडून ते हात कलम केले जाईल – अजित कुलकर्णी

प्रहारच्या वतीने जाहीर निषेध

0
33

उत्तर सोलापूर (विशाल सपकाळ )

महाराष्ट्रातील हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी २५ गडकिल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या वृत्तानंतरसर्वसामान्यांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे याचा प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो,
जर शिवरायांच्या गड किल्ल्यांना कोणी हात लावण्याचे प्रयत्न केल्यास ते हात प्रहारकडून कलम केले जाईल असे
प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी निषेध आंदोलनाप्रसंगी व्यक्त केले. यामुळे शिवरायांनी स्थापित केलेल्या गड व किल्ल्यांची हानी होणार-जमीर शेख
महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने
सुरू केल्याचं वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाले आहे.त्यानुसार,हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळानं राज्यातील २५ गडकिल्ल्यांची निवड केली आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक
वाढवण्यासाठी या किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने
केली आहे. किल्ले लग्न समारंभांसाठी भाड्याने दिली जाणार आहेत,त्यामुळे शिवरायांनी स्थापित केलेल्या गड व किल्ल्यांची हानी होणार आहे असल्याने सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावे अन्यथा उद्या मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ताब्यात घेऊन आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही असे प्रतिपादन शहर संपर्कप्रमुख जमीर शेख यांनी केले.

सदर निषेध मोर्चा सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. सदर मोर्चात शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार, उपप्रमुख संभाजी व्हनमारे, फिरोज शेख, दक्षिण ता.कार्याध्यक्ष सिध्दाराम काळे, मोहसीन तांबोळी (वळसंग), शब्बीर नदाफ,सचिन वेणेगुरकर, प्रणव शेंडेसह यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात
उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here