Categories: सामाजिक

खून लो..लेकीन जान मत लो ; प्रहार चे अनोखं आंदोलन

By-MH13 NEWS,वेब/टीम

अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रहार संघटनेने अनोखे आंदोलन केल्याने संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.अक्कलकोट प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने ‘खून लो लेकीन जान मत लो ‘म्हणत अनोखं आंदोलन करण्यात आलं

ग्रामीण भागातील गरजू तसेच गोरगरीब रुग्णांसाठी आयसीयू विभाग चालू करणे, ट्रॉमा केअर व नवीन विस्तारित इमारतीचे काम पूर्ण करून अॅक्सीडेंट, डिलिव्हरी,शस्त्रक्रिया सर्पदंश, रेबीज यावर उपचार मिळावेत या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. त्याच बरोबर उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांच्या संख्येत वाढ करून बायोमेट्रिक मशीन बसवणे व ऍम्ब्युलन्स उपलब्ध ठेवणे या मागण्यांचा समावेश होता .

यावेळी शेकडो युवकांनी रक्तदान करून केलं.भीमाशंकर हरवाळकर या तरुणाचा अक्कलकोट रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार न करता तसेच सोलापूरला हलवण्याचा सल्ला दिला. वाटेतच उपचारा अभावी कुंभारी जवळ जाताना मृत्यू झाला .जर त्याला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाला असता तर भीमाशंकर हरवाळकर जगला असता डॉक्टरांच्या अभावामुळे मृत्यू झाला असल्याचे ही आंदोलनकर्त्यांचे म्हणणं होतं.जिथे बारा डॉक्टरांची गरज आहे तिथे एक एम.डी.अशोक राठोड व एक एमबीबीएस गजाकोश या दोघांवर संपूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी असून दररोज शेकडो रुग्णांना उपचाराअभावी परत जावं लागत आहे ही बाब संतापजनक आहे.

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रथमदर्शनी रक्तदान आंदोलन केले असून लवकरात लवकर डॉक्टरांची संख्या वाढवून ICU विभाग चालू करावा.अन्यथा या नंतर व्यवस्थेमुळे जर आणखी एखादा पेशंट दगावला तर प्रहार शेतकरी संघटना त्या प्रेताला पालकमंत्री यांच्या कार्यालयाला घेऊन जाऊ असं यावेळी आंदोलकांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक ,पालकमंत्री, स्थानिक आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दखल घेऊन प्रहारची मागणी पूर्ण नाही केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं .यावेळी प्रहार शेतकरी संघटना जिल्हा युवक अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण शहराध्यक्ष अमर शिरसाट,सागर शिरसाट,निशांत निंबाळकर, विजय माने, सुभेदार अमोल पाटील, गणेश मोरे, नागेश हरवाळकर यांच्यासह अक्कलकोट मधील शेकडो पुरुष महिला उपस्थित होत्या.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

15 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago