Update – सोलापुरातील यंत्रमाग, गारमेंट उद्योगासाठी लवकरच सकारात्मक निर्णय: पालकमंत्री भरणे

सोलापूर, दि. 29- सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.

गारमेंट, यंत्रमाग असोसिएशनची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.

यावेळी गारमेंट असोसिएशनचे प्रतिनिधी रामवल्लभ जाजू, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, अमित जैन, राजेंद्र कुचन, प्रकाश पवार यांनी सोलापुरात गारमेंट व यंत्रमाग उद्योग सुरू करण्याची मागणी केली. सोलापुरातील गारमेंट व यंत्रमाग उद्योग अडचणीत असून कामगारांच्याही अडचणी वाढल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना आणि लॉकडाउनचे सर्व नियम पाळून उद्योग सुरू करण्याची मागणी यावेळी प्रतिनिधींनी केली.

यावेळी पालकमंत्री भरणे यांनी गारमेंट व यंत्रमाग उद्योजकांच्या अडचणी जाणून घेत यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

1 hour ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

2 hours ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

12 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

20 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

21 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago