अक्कलकोट येथे कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलीस पाटलांची कार्यशाळा

MH13News,network

250,अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांची तहसील कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .

गावपातळीवर पोलीस प्रशासन आणि जनता यामधील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने बंदोबस्ताची कर्तव्ये व जबाबदाऱ्या या विषयावर अक्कलकोट तालुक्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .या कार्यशाळेत निवडणुकीच्या संदर्भाने पोलीस पाटील यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, पोलीस पाटील यांचे निवडणूक काळातील निःपक्ष वर्तन व घ्यावयाची दक्षता, निवडणूक प्रचार काळातील निवडणूक आदर्श आचारसंहिता या विषयवार अंजली मरोड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित पोलीस पाटलांनी निवडणूक काळात आपली कर्तव्ये चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडून विधानसभा निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन ही या वेळी केले. या कार्यशाळेला तालुक्यातील पोलीस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

वाचा – ‘इयत्ता राफेल’ मध्ये मोदी सरकार पास!

राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील खंडपीठाने राफेल प्रकरणातील…

1 min ago

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

17 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

20 hours ago