अन् महापौर भावनाविवश.. महापौरांसह पती श्रीशैल बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवकाचे जबाब नोंदवले

सुरेश पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याची बिपीन पाटील यांची पोलिसांत तक्रार

0
14

अन् महापौर भावनाविवश..
महापौरांसह पती श्रीशैल बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवकाचे जबाब नोंदवले

सुरेश पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याची बिपीन पाटील यांची नवी तक्रार

(वेब/टीम)
नगरसेवक सुरेश पाटील विषबाधा प्रकरणी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी आणि भाजपाचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गीसह नगरसेवक कामाठी यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात जावून आपले जबाब नोंदवले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली. जबाब नोंदविल्यानंतर  महापौर बनशेट्टी यांना दुःख अनावर झाल्याने बोलता आले नाही .तर सुरेश पाटील यांची व्हॉटसअॅपवर बदनामी केल्याची तक्रार बिपीन पाटील यांनी पोलीसांकडे दिली.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी विष देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्या संशयित काहीजणांची नावे जोडभावी पेठ पोलीसांकडे दिली होती. त्यामध्ये सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, नगरसेवक सुनिल कामाठी, शहर भाजपाचे अध्यक्ष अशोक निंबर्गी, राज्य सहकारी बॅकेचे संचालक अविनाश महागांवकर यांच्यासह अनेकांचे नावे यामध्ये समावेश केले होते. त्यावरून पोलीसांनी आरोप झालेल्यांचा जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये बुधवारी शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे, महानगर पालिकेतील काही शिपाई, कर्मचारी अधिकारी यांचे तर गुरूवारी दुपारी महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, अशोक निंबर्गी यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास पोलीसांनी केला पाहिजे आणि त्यातून खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेवून त्याला कडक शासन केले पाहिजे असे व्यक्त केले आहे. या प्रकरणात आणखी बऱ्याच जणांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याचेही पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी सांगितले.

सुरेश पाटील यांची बदनामी….

एका व्हॉटसअॅप ग्रुपवर सुरेश पाटील यांच्या विषयी एकेरी भाषेत बदनामी करणारा मेसेज आला होता. त्यावरून सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपीन पाटील यांनी या बदनामीकारक मेसेजवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीसांनी अदखलपात्र तक्रार दाखल करून भाजपाच्याच दोघा कार्यकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांना माहिती कळवा – पोलीस निरीक्षक केडगे

सुरेश पाटील यांच्या विषबाधा प्रकरणी ज्या कोणाला माहिती असेल त्यांनी ती माहिती किंवा पुरावा जोडभावी पेठ पोलीसांना द्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक केडगे यांनी केले त्याचबरोबर सोशल मिडीयामध्ये किंवा कोणत्याही प्रसार माध्यमाद्वारे सुरेश पाटील विषबाधा प्रकरणावरून बदनामीकारक मेसेज देवू नये अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक केडगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here