Categories: सामाजिक

लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिकच्या अध्यक्षपदी कवी आसिफ इक्बाल

By-MH13NEWS,NETWORK
लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिकच्या अध्यक्षपदी कवी लॉ. आसिफ इक्बाल यांची निवड करण्यात आली आहे.
हा पदग्रहण समारंभ शनिवार दि. 20 जुलै रोजी सायं. 7.00 वाजता रंगभवनजवळी दि मॅसॉनिक हॉलमध्ये पार पडला. माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर लॉ. प्रभुचंद्रा झपके व माजी रिजनल चेअरमन लॉ. नरेंद्र गंभीरे यांच्या हस्ते नव्या प्रेसिडेंट व सदस्यांना त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खान कॅम्पसचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ डॉ. असदुल्लाह खान उपस्थित होते.

माजी प्रांतपाल लॉ.अरविंद कोनशिर्सगी, लॉ. डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी,लाॅ. ख्वाजा शेख, लॉ. डॉ. गुलाबचंद कासलीवाल, लॉ. अशोक मेहता, लॉ. डॉ. नारायणदास के. चंडक, लॉ. डॉ. गुलाबचंद शाह, रिजन चेअरमन लॉ. राजशेखर कापसे, झोन चेअरमन लॉ. जुबेर शेख, रोटरी क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनचे जाहिद अली खान, महाराष्ट्र लायन्स एडिटर लॉ. आझम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मावळते अध्यक्ष लॉ. सीए.मौलाना शेख, सचिव लॉ. गणेश पाटील, लॉ. आझम शेख, लॉ. अनिल विपत, लाॅ. जुबेर शेख व इतर मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.

लॉ. प्रभुचंद्र झपके यांनी लॉयनाझमबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, संपूर्ण जगात लॉयन्स क्लबमुळे माणुसकीला वाव देण्याचा कार्य सुरू आहे. लॉयन्स क्लबच्या माध्यमातून माणसाना जोडण्याचा काम व समाजकार्य उत्तम रित्या चालू आहे. लॉ. झपके यांनी नूतन अध्यक्ष व नवीन कार्यकारिणीला पद व गोपनियतेची शपथ देऊन त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली.
नूतन अध्यक्ष लॉ. आसिफ इक्बाल यांनी लॉयन्स क्लबच्या माध्यमातून कायम स्वरूप प्रोजेक्ट सुरू करण्याचा असा मानस केले. क्लबच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण महत्त्वाच्या रूपरेषा ठरविली असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापुरातील खान कॅम्पसचे संस्थापक डॉ. असदुल्लाह खान यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भर देण्याचे आवाहन केले व नूतन अध्यक्ष लॉ. आसिफ इक्बाल यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या पदग्रहण समारंभास सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.ए. दलाल, प्राचार्य जब्बार शेख, मुख्याध्यापक संघाचे इरफान केरुल, नगरसेवक रियाज हुंडेकरी, अजय दासरी, अनिल गायकवाड, प्रवीण सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमेना जनवाडकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिव लॉ. शब्बीर शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार लॉ. आफताब ममदापुरे, एजाज धाराशिवकर, लाॅ. अ. गनी पठाण व इतर सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

तातडीने राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा – ठाकरे सरकारने दिला आदेश

मुंबई, दि. 9 : राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे, तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा…

10 hours ago

#बोरामणी विमानतळासाठी प्रयत्नशील – नागरी विमान वाहतूकमंत्री हरदिपसिंग पूरी यांचं आश्वासन

दिल्ली, दि. 09 डिसेंबर 2019 : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री भारत सरकार…

11 hours ago

अभिजित कानडे यांच्या सकारात्मकतेला सलाम – डॉ. बी.पी. रोंगे

पंढरपूर– ‘स्वेरीचे माजी विद्यार्थी अभिजीत कानडे हे विद्यार्थी दशेत असताना अत्यंत सकारात्मक विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांचे कार्य विशेष लक्षात रहात होते.अभ्यास…

12 hours ago

#घंटागाडी : आता.. शाळा अन् लेकरं घेतील मोकळा श्वास !

सुनील कोडगी,सोलापूर ' त्या' शाळा परिसरातून स्मार्ट घंटागाड्या अखेर हलल्या... सोलापुरातील जय भवानी प्रशाले समोरील प्रांगणात स्मार्ट सिटीतील घंटागाड्या त्याही…

14 hours ago

सोलापुरातील ‘या’ प्रशालेत रात्री बहरतेय तळीरामांची शाळा !

सोलापूर (प्रतिनिधी) दोन दिवसांपूर्वी MH13 न्युज ने जयभवानी प्रशालेत स्मार्ट घंटागाडी.? प्रश्नास वाचा फोडली आणि त्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली.…

14 hours ago

काशीपीठाच्या शतमानोत्सवात सोलापूरकर बजावणार महत्त्वपूर्ण सेवा

सोलापूर : काशी पीठात दिनांक 15 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2020 पर्यंत गुरुकुल शतमानोत्सव साजरा होणार आहे. या समारंभात संपूर्ण…

22 hours ago