Categories: सामाजिक

अनुदान मंजुरी अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन..!

By-MH13NEWS,नेटवर्क

राज्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदान मंजुर करा अन्यथा गुरुवारी मंत्रालयासमोर सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आल्याची माहीती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.

मान्याताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील नैसर्गिक वर्ग/ तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मंजुर करा.या मागणीसाठी मागील पाच दिवसापासुन मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.संघटनेचे राज्य समन्वयक शामराव लवांडे व नैसर्गिक तुकडी कृती समितीचे राज्य कार्याध्यक्ष श्रद्धेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.या तुकडीवर राज्यातील हजारो शिक्षक मागील ८/१० वर्षापासुन विनावेतन कार्यरत आहेत.यापुर्वी या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनाची पुर्तता अद्याप करण्यात आली नाही.या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदान मंजुर न केल्यास गुरुवारी मंत्रालयासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात शिवकुमार अंबुलगे,संदीप बिराजदार,शिवशंकर स्वामी,अशोक नाटकरे,गोविंद मुळे,सचिन परिट,निखिल घोडके,दिपक पाटील,आदी सहभागी झाले आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

48 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago