ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network

सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष उफाळून आला होता. ऐन सणासुदीच्या दिवशी महापालिका जाणीवपूर्वक पाणी देण्यास उशीर करत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा सावळागोंधळ कधी थांबणार अशी संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गांनी व्यक्त केली आहे.

सोलापुरातील पाणीपुरवठा नियोजनाचा सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला आहे. भवानी पेठ येथील पाणी गिरणीतील पंप चालू आहे .हिप्परगा तलावातून मोठ्या प्रमाणात ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून मुबलक पाणी येत असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता भागातील बुधवार पेठ,छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागाचा होणारा पाणी पुरवठा अचानक बंद करून हे पाणी हाय लेवल पाण्याच्या टाकीकडे वळवण्यात आले. याची कल्पना भवानी पेठतील कुठल्याही अधिकाऱ्यांना नसल्याची धक्कादायक माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना भवानी पेठ येथे पाहणी केली असता निदर्शनास आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही वंचित आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केली आहे.

टाकळी पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. नंदुर- समशापुर जवळ काल रात्री अडीच वाजता ‘एमएसईबी’चा टॉवर पडला होता. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी अक्कलकोट- करजगी वरून लाईन टाकून रात्री साडेआठ वाजता वीज प्रवाह सुरळीत केला. सलग 15 ते 16 तास लाईट नसल्याने पंपिंग करू शकलो नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सबब आजचा होणारा पाणीपुरवठा हा उद्या होईल.

संजय धनशेट्टी, सार्वजनिक आरोग्य अभियंता पाणीपुरवठा विभाग

सोलापूर महानगरपालिका

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago