गावठी बंदूक विक्री करताना दोघांना पंढरपूर पोलिसांनी केली अटक

0
8

पंढरपूर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून पंढरपूर शहर पोलिसांनी दोन तरुणांची झडती घेऊन देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त केला. गावठी कट्ट्यासह त्यांच्याकडून ६७००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहोळ तालुक्यातील दोन तरुण गावठी पिस्तुलाच्या व्यवहारासाठी पंढरपूर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

प्रवीण बाळासाहेब शेळके – कोन्हेरी ता. मोहोळ आणि तात्या लक्ष्मण जाधव – पेनूर ता. मोहोळ या दोन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. निकम यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here