सोलापूर सभेसाठी पंढरपुर भाजपाची बैठक संपन्न

0
19

By-MH13News,network

सोलापूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची दि 1 सप्टेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्याची सांगता सोलापूर येथे होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी शहर भाजपाची बैठक ह.भ.प.शंकर महाराज वंजारी यांच्या मठामध्ये शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत पंढरपुर शहरातील जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील जाहीर सभेला जाणे करिता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन वाईकर यांनी केले.

      या बैठकीत भाजपा नेते डॉ बी. पी.रोंगे, राज्य कार्य. कारिणी सदस्य बाबासाहेब बडवे,माजी शहराध्यक्ष उमेश वाघोलीकर , बादलसिंह ठाकुर, कार्यालय प्रमुख आनंद नगरकर आदिंनी विचार मांडले.

 या बैठकीला डॉ शशिकांत धायतडक , विदुल अधटराव , लखन ननवरे , शाम तापडीया, अशपाक नदाफ, राम चौगुले, अनुप देवधर, आदित्य जोशी, वालचंद जामदार, विस्तारक दशरथ काळे, महिला मोर्चा अध्यक्षा  अपर्णा तारके, डॉ प्राजक्ता बेणारे, प्रतिभा नाझरकर , वर्षा चंन्केश्वरा, सुरज रोंगे, रमेश जगदाळे, वसंत चोले, आनंद कुलकर्णी, निलेश चव्हाण, अमर अभंगराव, सतिश सासवडकर, किरण खडाखडे , राहुल वाघ, धनंजय तारके, समर्थ सासवड़े ,किरण वाडेकर आदी उपस्थित होते.  शहर सचिव सुरेंद्र कवठेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here