आदेश बंधनकारक : खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी ‘राखीव’

MH13 NEWS Network

  • कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईसह राज्यातील
  • खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राज्य शासनाने केल्या राखीव
  • शासनाच्या आदेशाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक आरोग्यमंत्री राजेश टोपे
  • मुंबई, दि. २२: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
    राज्य या शासनाच्या या आदेशानुसार ही खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
    खासगी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करीत होते. आता शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.
    मुंबईमधील शासकीय व महापालिकांच्या रूग्णालयांमधील खाटा काहीप्रमाणात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध होत नसून आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णयाला मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
    या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यात साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत. त्यामुळे या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केला जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
    या आदेशानुसार कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले असून दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व ९००० रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने काढलेला हा आदेश राज्यात ३१ ऑगस्टपर्यत लागू राहणार आहे.
    रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना तक्रार निवारणीसाठी प्राधीकृत केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago