ऑनलाइन मटका |’आरोपीं’ची संख्या गेली 280 पार…

सोलापूर दि.5 सप्टेंबर

अशोक चौक भागातील कोंचीकोरवे गल्लीतील ऑनलाइन मटक्यावर छापा टाकल्याप्रकरणी आरोपींची संख्या 288 पोहोचली. यातील आरोपी नगरसेवक सुनील कामठी अद्याप फरार असून त्याच्या मालमत्तेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अटकेतील बडतर्फ पोलिस शिपाई स्टीफन स्वामीसह 28 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी त्यांच्या पथकासह 24 ऑगस्ट रोजी ऑनलाइन मटक्यावर छापा टाकला होता. त्याच दरम्यान त्यांनी तेथे ऑनलाइन मटका चालवण्याचे साहित्य तसेच काही आरोपीना जागेवर तर तपासादरम्यान असे एकूण 28 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी नगरसेवक कामाठीसह 40 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासादरम्यान आरोपींची संख्या आणि आता आरोपींची संख्या 288 वर पोहोचली आहे. यामुळे मटका बुकी लाईनवरील कर्मचारी व एजंटामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून कामाठी याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या घरात आढळलेल्या नोंदवहीमध्ये कोणाला किती रक्कम देण्यात येत असेल याचा हिशोब ठेवण्यात आल्याचे समजते या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे हे करीत आहेत.
अटकेत असलेल्या सर्व आरोपींचा जामीन अर्ज शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. सी. शेख यांच्यासमोर ठेवला होता. सदर गुन्हाच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस तर गुन्ह्यात लावलेले 420 कलम लागू होत नसल्याचा युक्तिवाद मांडला तसेच सर्व आरोपी हे स्थानिक रहिवासी आहेत. त्यामुळे ते कोठे पळून जाणार नाहीत असे मुद्दे मांडले. न्यायाधीशांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुलक्यावर सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी, ऍड. राजकुमार मात्रे, ॲड. श्रीकांत पवार, ऍड. दिनेश भोपळे, ॲड. समीर बागवान यांनी तर सरकारतर्फे ऍड. यु. बी. करवते यांनी काम पाहिले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

8 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago