Categories: राजकीय

कामाच्या आधारावरच प्रणितीताईंना निवडून द्या : सुश्मिता देव

सोलापूर :- गत दहा वर्षात आमदार या नात्याने प्रणितीताईंनी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तेव्हा याच कामाच्या आधारावर जनतेने त्यांना तिसर्‍यांदा निवडून देऊन जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी गुरुवारी सायंकाळी सिव्हील चौकनजीकच्या अचिव्हर्स हॉलमध्ये केले.

शहर मध्य मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी राजस्थानच्या महिला व बालकल्याणमंत्री ममता भूपेश, ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी देव पुढे म्हणाल्या की, सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महागाई, महिला सुरक्षा आदी मुद्यावर निवडणूक लढवून भाजपने सत्ता काबीज केली. पण या पक्षाची सत्ता आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे लक्षात घेता महिलांनी या निवडणुकीत कॉंग्रेसला निवडून देणे गरजचे आहे.

याप्रसंगी ममता भूपेश म्हणाल्या की, शहर मध्य मतदारसंघातील काही उमेदवार हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे आहेत. या उमेदवारांनी कॉंग्रेसला साथ दिली नाही. त्यामुळे ते जनतेची साथ कशी देणार असा प्रश्‍न आहे. भाजपने या निवडणुकीत रोजगाराचे अभिवचन दिले आहे, मात्र गत पाच वर्षात त्यांनी रोजगारविषयक काहीच केले नाही. नोटबंदीमुळे जनता वेठीस धरली गेली. त्यामुळे जनतेने या निवडणुकीत प्रणितीताईंना प्रचंड मतांनी निवडून देऊन भाजप-सेनेला धडा शिकवावा.

याप्रसंगी प्रणितीताई म्हणाल्या की, भाजप-सेनेची सत्ता आल्यापासून महिलांवर अत्याचार होत आहेत.

याविरोधात पेटून उठून महिलांनी या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘या’ तालुक्यातील लोकांना तब्बल 1 कोटी 32 लाखांचा चुना

MH13NEWS Network लोक आशेवर जगतात हे जरी मान्य केले तरी अति हव्यासापोटी लोक स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात, याचा प्रत्यय…

3 hours ago

धक्कादायक : प्रजासत्ताकदिनी ‘येथील’ शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

MH13NEWS Network आजच्या प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक प्रकार पंढरपुरातील शासकीय कार्यालयासमोर घडला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने पंढरपुरातील शेतकऱ्याचा जीव…

10 hours ago

थरारक : पंढरपूरच्या भाळवणीत गोळ्या घालून खून

MH13NEWS Network पंढरपूर तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली आहे.तालुक्यातील भाळवणी गावात विश्वास उर्फ बापू भागवत यांची गोळ्या घालून हत्या…

11 hours ago

सोलापुरात आजपासून ‘येथे’ मिळेल ‘शिवभोजन’

MH13NEWS Network पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात…

12 hours ago

शहरास बनवूया धार्मिक पर्यटन स्थळ ; महापौरांनी प्रजासत्ताक दिनी दिला विश्वास

MH13NEWS Network आजच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास मा.महापौर व मा.पदाधिकारी तसेच विभागीय अधिकारी यांनी पुष्पहार…

16 hours ago

वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

MH13NEWS Network श्री वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर…

1 day ago