Breaking | सोमवारी जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली आहे़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एस.टी. बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर २०२० रोजी मराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे.

या बंद काळात अनुचित प्रकार होऊ नये. यासाठी २१ रोजी मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून २१ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपयृंत जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा आरक्षण संघटनेच्यावतीने गावपातळीपासून तालुका ते जिल्हा पातळीवर बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये तालुका व जिल्हा बंद करणे, तसेच खासदार व आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करणे .त्यांना घराबाहेर पडू न देणे, आंदोलनात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ,असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व एसटी बसची सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

8 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago