Categories: राजकीय

आता ‘कोठे’… प्रवेश लांबणीवर..!!- वाचा सविस्तर

मुंबई – येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सोलापुरातील विविध पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, यांच्या हस्ते पक्षात जाहीर प्रवेश आज शुक्रवारी करण्यात आला.परंतु शहराच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या शिवसेनेचे महेश कोठे यांचा प्रवेश मात्र लांबणीवर पडला आहे.

यांनी हातात बांधले घड्याळ…

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे युवराज चुंबळकर, सलाम शेख, उमेश रसाळकर, राजमहेंद्र कमटम, बाबुराव जमादार, रियाज मोमीन, नितीन करवा, श्याम पंचारीया, परशुराम भिसे, युवराज सरवदे इत्यादींचा पक्ष प्रवेश पार पडला.

या छोट्याश्या सुंदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन खासदार सुप्रिया सुळे व शिवाजीराव गर्जे यांनी केले होते, यावेळी सूत्र संचालन शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले तर मंचावर राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत (तात्या)माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम(काका) साठे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब (भाई) शेख, माजी शहराध्यक्ष महेश(भाई) गादेकर, माजी उपमहापौर दिलीप(भाऊ) कोल्हे, ज्येष्ठ नेते माजी महापौर जनार्दन कारमपुरी, महिला शहर अध्यक्ष सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष प्रमोद भोसले, VJNT सेल शहर अध्यक्ष रुपेश भोसले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष फारुक मटके, विद्या लोळगे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्दे

  • आजच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पत्रकार परिषदेत महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केली असल्याचे सांगितले.
  • तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रकाश वाले यांनी पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या कोठे यांच्याकडे शहरातील निम्मी इस्टेट असल्याचा आरोप केला.
  • भाजपात जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार यावर बराच काळ खलबते सुरू होती. अखेरीस महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश निश्चित केला आहे असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. परंतु सध्यातरी त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

1 hour ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

24 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago