आता.. सरसकट कर्जमाफी जाहीर करा : फडणवीस,विरोधी पक्षनेता

by-MH13News,network

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी सरकार कडे केली. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे सांगितलं होते. त्याच सोबत सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला आहे, हा कर्जमाफीचा कार्यक्रम सरकारने जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण आम्ही करून देत आहोत. या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडू नये. शेतकऱ्यांच्या संदर्भात अजूनही एकही निर्णय झाला नाही असेही फडणवीस म्हणाले.

राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा येईल आणि फक्त गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी नियम व अटीं लावल्या आहेत .सरसकट कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वी सरसकट कर्जमाफी जाहीर करावे.

महाविकास आघाडीच्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडू नये, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणाचा आणि सातबारा कोरा करण्याचा शब्द नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला होता. सरसकट कर्जमाफीची घोषणा करून कालबद्ध कार्यक्रम सरकारने जाहीर करावा. सरसकट कर्जमाफीची मागणी विरोधक म्हणून करत नसून सरकारला कर्तव्याची आठवण करून देत आहोत असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात आतापर्यंत एकही निर्णय घेतलेला नाही.
आजच्या पत्रकार परिषदेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. गिरीश महाजन हे उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

29 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

45 mins ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago