बार्शी मतदारसंघातील ‘या’ सहा उमेदवारांना नोटीस

सोलापूर, दि. 16:-  246 बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी दि. 16 ऑक्टोबर 2019 रोजी खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय, बार्शी येथे करण्यात आली. या तपासणीवेळी अनुपस्थित असलेबाबत राजकीय पक्षांचे कनिष्क सुरेश शिंदे, नागनाथ अभिमानु चावण या उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली आहे. अॅङ दिलीप सोपल ( राजकीय पक्ष) , राजेंद्र राऊत (अपक्ष), भुमकर निरंजन प्रकाश ( राजकीय पक्ष) यांना निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने त्यांना नोटीस देण्यात आली. याचवेळी जगन्नाथ निवृत्ती मुंडे या उमेदवारांना  निवडणूक खर्च बँकेमार्फत करण्यात आलेला नसलेने त्यांना नोटीस देण्यात आली आहे.  या  सर्व उमेदवारांना नोटीस मिळालेनंतर 48 तासात खुलासा करण्याविषयी खर्च निरिक्षक यांनी निर्देशित केले आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी कळविले आहे.

बार्शी विधानसभा मतदारसंघातील खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांनी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करुन, खर्च तपासणी पथकातील सर्व सदस्य, उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी  यांना निवडणूक खर्च सादर करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

MH13 News

Recent Posts

वाचा – ‘इयत्ता राफेल’ मध्ये मोदी सरकार पास!

MH13 NEWS NETWORK: राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील…

10 mins ago

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

27 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

21 hours ago