Categories: राजकीय

सहा महिन्यात 3 पालकमंत्री… विरोधात नाही तर ‘सूचनात्मक’ आंदोलन: आ. सुभाष देशमुख

सक्षम पालकमंत्री नसल्याने प्रशासन हतबल असल्याचा आरोप

कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. सक्षम पालकमंत्री नसल्यामुळे येथील प्रशासनामध्ये सुसूत्रता नाही, ते हतबल आहे. खाजगी रुग्णालय मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांचेही प्रचंड हाल सुरू आहेत. राज्यशासनाने आतातरी जागे होऊन ही सर्व परिस्थिती थांबवावी. हे भाजपचे सरकारच्या विरोधात नाही तर सूचनात्मक आंदोलन आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

करोनाचे संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपने शुक्रवारी सकाळी आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन केले. आमदार देशमुख यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अंगणात उभे राहून, मास्क लावून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून, काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला.  या आंदोलनात आमदार सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उपमहापौर राजेश काळे, युवा नेते मनीष देशमुख, राज्य शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आमदार देशमुख म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याला सहा महिन्यात तीन पालकमंत्री मिळाले हे दुर्दैव आहे. एका पालकमंत्र्यांनी आदेश काढला की तो पारित व्हायच्या आत दुसरा पालकमंत्री येतो. दुसऱ्याने केवळ एक बैठक घेत सूचना दिल्या की लगेच तिसरे पालकमंत्री आले. यासारखे दुर्दैव कोणतेही नाही. सध्या सोलापुरात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहेत. त्यांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. लवकरात लवकर खासगी ररूग्णालय ताब्यात घेणे आवश्‍यक आहे. मात्र या सर्व प्रक्रिया पालकमंत्री जागेवर असल्या तरच तातडीने होतात. सक्षम पालकमंत्री नसल्यामुळे प्रशासनात सुसूत्रता नाही, ते पुरते हतबल झालेले आहे. रुग्णांना योग्य सुविधा नाहीत, डॉक्टरांना आणि आरोग्य सेवकांना संरक्षण साहित्य नाही. प्रतिबंधक क्षेत्रात मास्कचे वाटप नाही, गरीब, गरजू लोकांना आज अन्न मिळेनासे झाले आहे. हे सर्व पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र असे असताना आज हे सर्व संस्था संघटना आणि दानशूर व्यक्ती करत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय शेतकऱ्यांचीही प्रचंड हाल होत आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही त्यांना खते आणि बियाणे मिळाले नाहीत. त्यांचा मालक पडून आहे त्याच्या विक्रीची व्यवस्था करण्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व बाबींकडे राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. हे भाजपचे सरकारच्या विरोधात आंदोलन नसून सूचनात्मक आंदोलन आहे, असेही आमदार देशमुख म्हणाले.
यावेळी सोमनाथ केंगणाळकार, शिवराज सरतापे, महेश देवकर , आनंद बिराजदार, दैदिप्य वडापूरकार, जगन्नाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

2 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

13 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

14 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

16 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

17 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

18 hours ago