पाडव्यादिवशी जन्मलेल्या नऊ बालकांच्या नांवे मुदत ठेव

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम

0
7

BY-MH13NEWS,नेटवर्क

सोलापूर : श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सकाळी पाडवा म्हणजे हिंदु नववर्षाच्या मध्यरात्री १२ वाजुन एक मिनिटानी जन्मलेल्या नऊ बालकांच्या नांवे एक हजार एक रुपयांची मुदत ठेवीसाठी धनादेश प्रदान कार्यक्रम शनिवारी पार पडला.
पाश्चात्यपध्दतीने नववर्ष साजरा न करता आपली संस्कृती व परंपरा जपत प्रतिष्ठानने हा अभिनव स्तुत्य उपक्रम राबविला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा प्रसुतीगृह, सोलापूर शासकीय रुग्णालयात मध्यरात्री नऊ बालकांनी जन्म दिला. त्या बालकांच्या नांवे १८ वर्षे मुदतीसाठी एक हजार एक रुपये मुदत ठेव ठेवण्यात येत आहे. त्यासाठी धनादेश बालकांच्या मातांना देण्यात आला. याभविष्यात शिक्षण व रोजगारासाठी याचा उपयोग होईल. या उद्देशाने ही रक्कम दिली.
याप्रसंगी प्रमुख पाहुने म्हणून हिंदु नववर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ बंग, समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, उपाध्यक्ष प्रकाश कालकोट्टे, सोलापूर केमिस्ट-डगिस्ट असोसिएशनचे माझी सचिव प्रशांत लोया, डाँ.ज्ञानेश्वर सोडल, प्रतिष्ठानचे सल्लागार नितिन करवा, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम साठी हिंदु नववर्ष महोत्सव समिती व निसर्ग माझा सखा याचा सहकार्य लाभले.
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शुभम कासट यानी केले. यावेळी विद्या भोसले, अश्विनी राठोड, विजयकुमार देशपांडे, सुहास भोसले, अरविंद म्हेत्रे, रुपेशकुमार भोसले, विजय जाधव, विक्रम बायस, दिपक बुलबुले, नितिन कुलकर्णी, सचिन शिंदे, नरसिंह लकडे, विनायक मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here