ऐन दिवाळीत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

0
2

(वेब/टीम)

नवरात्री पाठोपाठ आता ऐन दिवाळी सारख्या सणात शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे. निवडणुकांमध्ये आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या भाजपाच्या घोषणा म्हणजे फुसका बार च ठरतोय. म्हणून आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या आंदोलनात शहरप्रमुख प्रताप चव्हाण, परिवहन सभापती तुकाराम मस्के, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगांवकर, कामगार नेते विष्णू कारमपुरी, विजय पुकाळे, लहू गायकवाड, संताजी भोळे, बाळासाहेब गायकवाड, शिवा ढोकळे, मनोज कामेगावकर, सचिन गंधुरे, मल्लू सातलगाव, विवेक इंगळे, उमेश बुक्कानुरे, प्रेम सातलगाव, जरगीस मुल्ला, मल्लू इनपे, निखिल हिप्परगी, दत्ता खलाटे, अतुल कदम, मिलन बोकेफोडे, रवी हक्के व गोवर्धन ग्यानपल्ली आदी उपस्थित होते.
आज महानगरपालिकेला सुट्टी असताना देखील शिवसेनेची नाळ जनतेशी जोडलेली आहे, जनतेसाठी शिवसेना सदैव कट्टीबध्द आहे. आम्ही शिवसैनिक जनता अडचणीत असताना सुट्टीवरा जाऊ शकत नाही असं म्हणत हे शिवसैनिक महानगरपालिके समोर जमले आणि “पाणीपुरवठ्याचा फुसका बार, हे तर आहे फेकू सरकार..” , “अब की बार, नको गाजर सरकार..”, “निष्क्रिय सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो..”, “गटबाजीत मश्गुल सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो..” “पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो..” अशा घोषणांनी परिसर दूमदमून गेला.

उजनी धरण भरलेलं असताना देखील केवळ प्रशासन व सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने व सत्ताधारी पक्षांतर्गत एकमेकांचे पाय ओडण्यात गुंतल्याने शहराववर जलसंकट कोसळलं आहे. यापूर्वी आम्ही दोनदा निवेदन दिलं आहे, आज आंदोलन करतोय. सुधारणा न झाल्यास शिवसेनेच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल.
– प्रताप चव्हाण
शहरप्रमुख, शिवसेना सोलापूर

मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या भाजपाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मागील दोन वर्षाचा कारभार पाहता सपशेल अपयश दिसून येतं. दिवाळीत आणलेला महागडा फटाका फुसका निघावा तसाच हा अनुभव आहे म्हणून आज प्रतिकात्मक मोठा फुसका बार उडविला. आगामी निवडणुकांमध्ये जनता यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.

– महेश धाराशिवकर
विभागीय संघटक, विद्यार्थी सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here