मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची बदली होणार नाही; दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांची ग्वाही

(वेब / टीम)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी असतात त्यामुळे अक्कलकोटचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची बदली होणार नाही आणि तसे मी बिलकुल होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी व्यक्त केला. मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याविरुद्ध अक्कलकोट नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर ही बदली रद्द करावी अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. यानंतर पुन्हा आज सर्वपक्षीय नेत्यांनी जानकर यांची भेट घेऊन बदली रद्द करण्याचे निवेदन दिले आहे. याभेटी दरम्यान जानकर यांनी प्रदीप ठेंगल यांच्या कार्य जाणून घेतले. त्यानंतर बदली करू देणार नाही असे सांगितले. सोमवारी प्रत्यक्षात मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नगर सचिवांशी चर्चा करून बदलीचा निर्णय रद्द करू आणि डॉ. ठेंगल यांची चौकशी थांबवू, असे जानकर यांनी सांगितले.

यावेळी अक्कलकोटमध्ये चाललेल्या चाललेल्या भ्रष्ट गैर कारभाराची माहिती जानकर यांना देण्यात आली. या प्रकरणात कोणत्याही नेत्यावर अथवा कार्यकर्त्यांवर काही अन्याय झाला तर ते सहन देखील
करणार नाही, असा इशारा त्यांनी सर्वांना दिला आहे. अक्कलकोट हे स्वामी समर्थ तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगला अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉ. ठेंगल यांनाच अक्कलकोटमध्ये ठेवावे तसा अहवाल शासनाला पाठवा, अशी सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना केली आहे. डॉ.प्रदीप ठेंगल यांच्या कामगिरीबद्दल जानकर यांनी समाधान व्यक्त केले.या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून बदली रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे.तसेच याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाही विनंती करणार आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. या शिष्टमंडळात रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, तालुका पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, अकबर मुजावर, दत्ता माडकर, दत्ता शिवशरण यांचा समावेश होता.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago