जीवघेणी जडवाहतुक गुरुवारपासून बंद; रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेत दिली परवानगी

0
5

(वेब टीम)
जवळपास साठ लोकांचे जीव घेणारी जड जीव घेणारी जड जड वाहतूकबंदी साठी सोलापूरकरांनी एकजूट दाखवली होती, त्याला सर्वपक्षीय नेते संघटना, संस्था यांनी पाठिंबा दिला. त्याचेच फलित म्हणून येत्या गुरुवारपासून शहरातून दिवसा १ ते ४ होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे परिपत्रक पोलीस आयुक्तांनी आज जाहीर केले .

जड वाहतूक मुक्त कृती समिती, सोलापूरकरांच्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव पडला होता. याच दरम्यान सोमवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शहरातून दिवसा जाणारी जडवाहतुक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी परिपत्रक जारी केले आहे .
गुरुवार दिनांक 13 सप्टेंबरपासून शहरातून दिवसा पूर्णपणे जडवाहतुक बंद राहणार आहे तसेच रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेतच शहरातून जडवाहतुक सुरू राहील. या बंदीतून जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल आणि पाण्याचे टँकर तसेच स्मार्ट सिटीच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्य या गाड्यांना वगळण्यात आल्याचं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितलं.
वाहनधारकांच्या व पादचाऱ्यांच्या जीवावर उठलेली जीवघेणी दिवसाढवळ्या होणारी जडवाहतुक बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here