Categories: राजकीय

आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? मनपा आयुक्तांची भूमिका

(वेब/टीम)

महापालिका कर्मचार्‍यांना बोनस व अग्रीम मिळणार नाही, असा पुनरुच्चार करतानाच आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शनिवारी कामगार नेत्यांपुढे “आडात नाही तर पोहर्‍यात येणार कुठून?” असा सवाल करीत आधी शहराचा विचार करावा लागेल, या शब्दांत आपली कठोर भूमिका मांडली.

गेल्या काही दिवसांपासून मनपा कर्मचार्‍यांचा बोनसचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. याबाबत मनपा कामगार संघटना कृती समितीने आंदोलन छेडले आहे, पण मनपाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने बोनस व अग्रीम देण्यास मनपा असमर्थ आहे, अशी ठाम भूमिका आयुक्तांनी शुक्रवारी घेतल्याने हा प्रश्‍न चिघळण्याची चिन्हे दिसत होते. कृती समितीच्या आंदोलनात शिवसेना वगळता काँग्रेस, बसपच्या नेत्यांनी सहभाग नोंदवित शुक्रवारी मनपातील सत्ताधारी तसेच प्रशासनाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले होते. याच वेळी कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी शनिवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख व महापौर शोभा बनशेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन जाब विचारण्याचा इशारा दिला होता.

यानुसार जानराव व त्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी सहकारमंत्री देशमुख यांची भेट घेऊन हा प्रश्‍न सोडविण्याची आग्रही मागणी केली. यावेळी ना. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ न शकल्याने मुख्य सचिव म्हैसकर व अन्य अधिकार्‍यांशी संपर्क साधून  हा प्रश्‍न सोडविण्याची विनंती केली. यानंतर ना. देशमुख यांनी महापौरांशी संपर्क साधून कुठल्याही स्थितीत कामगारांना बोनस व अग्रीम देण्यासंदर्भात प्रयत्न करावे, अशी सूचना केली. याप्रसंगी सांगलीचे पालकमंत्री असलेल्या ना. देशमुख यांनी सांगली मनपाच्या कर्मचार्‍यांना बोनस व अग्रीम देण्याचे आदेश सांगलीच्या आयुक्तांना दिले. यावेळी कृती समितीचे जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, भालचंद्र साखरे, बापू सदाफुले, बाली मंडेपू, श्रीनिवास रामगल, सायमन गट्टू आदी उपस्थित होते.

महापौरांची आयुक्तांना विनवणी

दरम्यान महापौर बनशेट्टी शनिवारी सकाळी आयुक्तांची भेट घेऊन कामगारांना बोनस व अग्रीम देण्याची विनवणी केली. जर बोनस व अग्रीम देत नसाल तर आपणही कामगारांप्रमाणे दिवाळी साजरी करणार नाही, असे स्पष्ट केले. मागील वर्षी यापेक्षाही अधिक बिकट परिस्थिती असतानाही बोनस व अग्रीम देण्यात आला होता. यंदा तुलनेत परिस्थिती  चांगली आहे. त्यामुळे उलट जास्त दिले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे महापौरांनी सांगितले.

सोमवारी मुख्यमंत्र्यांसमोर हतबल आंदोलन : जानराव

आयुक्तांनी शनिवारी बोनस व अग्रीम देण्यास पुन्हा एकदा नकार दिल्यावर कृती समितीची भूमिका मांडताना जानराव म्हणाले की, आम्ही महापौर, आयुक्त, दोन मंत्री यांना भेटून विनंत्या केल्या, पण आमच्या पदरात काही पडले नाही. आयुक्तांनी जणू काळी दिवाळी साजरी करण्याचेच आदेश दिले आहेत. आता आम्ही हतबल झालो असून 40 वर्षांपासून बोनस व अग्रीम देण्याची परंपरा होती पण ही परंपरा प्रथमच खंडीत होत आहे. त्यामुळे सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊच त्याचबरोबर गार्‍हाणी मांडणार आहोत. त्यांच्यासमोर हतबल आंदोलन करण्यात येणार असल्याचे जानराव यांनी सांगितले.

पालकमंत्री देशमुख यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधले असता त्यांनी शनिवारी चारची वेळ दिली होती, पण ते परगावी असल्याने सायंकाळपर्यंत भेट झाली नाही,अशी माहिती जानराव यांनी यावेळी दिली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

1 hour ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

12 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

13 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

15 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

16 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

17 hours ago