Categories: राजकीय

माढ्याच्या साठेंची काँग्रेसमधील घरवापसीचे वृत्त ठरले तंतोतंत खरे!

MH13 NEWS NETWORK :

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारमुळे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये गेलेल्या बहुतांश नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली दिसून येते. याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात सध्या भाजपात असलेले आणि माढा तालुक्यातील जुने काॅग्रेसचे निष्ठावंत साठे घराण्याची घरवापसी होण्याची शक्यता चर्चेत येत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था शक्यता निर्माण झाली असल्याचं वृत्त MH13 NEWS च्या ऑनलाईन वेबवर दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आज माजी आमदार धनाजी साठे यांनी पुत्र दादासाहेब साठे यांच्यासह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्यामुळे भाजपला माढ्यात मोठा फटका बसलेला आहे .

हे ही वाचा : माढा तालुक्यातील साठे घराण्याची काँग्रेस पक्षात घरवापसी?

आमच्या घराण्याचा मूळचा पिंड हा कॉंग्रेसचाच होता. हा पक्षच सर्वांना समान न्याय देऊ शकतो , अशी प्रतिक्रिया श्री. साठे यांनी यावेळी व्यक्त केली.

गत २०१४ च्या विधानसभेच्या रणधुमाळीत दादासाहेब साठे यांनी 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपापुरस्कृत निवडणूक लढवली. तत्कालीन निवडणूकीत भाजप पक्षाला उमेदवार नव्हता. यावेळी निवडणूक कठीण असतानाही भविष्यकाळात कुर्मदास कारखान्यास मदत होण्याच्या शब्दाखातर भाजपकडून निवडणूक दादासाहेब साठे यांनी निवडणूक लढवली. यामध्ये अपयश आल्यानंतरही नव्याने स्थापन झालेल्या माढा नगरपंचायतीवर बहुमताने साठे गटाने सत्ता स्थापन केली. जिल्ह्यातील भाजपशासित एकमेव  नगरपंचायत ठरली. माढा नगरपालिकेत 17 पैकी 11 नगरसेवक निवडून आणून सत्ता आणली. नगराध्यक्षपदी सध्या त्यांच्या स्नुषा ऍड. मीनल साठे या आहेत. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यावर कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे साठे यांनी कॉंग्रेस प्रवेशासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी श्री. शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रवेश निश्‍चित केला होता.

आजच्या काँग्रेस प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार ऍड. रामहरी रूपनवर, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महापालिकेतील गटनेते चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, शिवलिंग सुकळे, गौरव खरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

1 hour ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

2 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

13 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

18 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

22 hours ago