पंढरपुरात 7 नवे कोरोना रुग्ण ; बँक संचालक,शहराध्यक्षसह…

MH13 News Network

आज मंगळवारी पंढरपूर शहरातील कोरोना बधितांची संख्या वाढली आहे. आणखीन 7 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका बँकेच्या 2 संचालकांचा समावेश आहे.

पंढरपुरात आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कर्मवीर भाऊराव औदुंबर पाटील नगर, जुनी पेठ, नवीपेठ व प्रदक्षिणा मार्गावर आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासन युद्धपातळीवर करत आहे.
मागील दोन दिवसापूर्वी पंढरपुरात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते तर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी सात जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका बँकेचे संचालक असणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाला असून त्याच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क लोकांची लक्षणे पाहून स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष, एक व्यापारी आणि एका वाहन चालकाचा समावेश असल्याचे समजते. यामुळे शहरातील रुग्णांची एकूण संख्या 9 झाली आहे.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करणाऱ्या पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरातील एका शिक्षकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याची आरोग्य तपासणी डॉक्टर असलेल्या तहसीलदार वाघमारे यांनी केली होती.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना बधितांची वाढणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago