Categories: राजकीय

‘वाघा’च्या गळ्यात ‘घड्याळ’ तर ‘पंजा’त ‘कमळ’ !

महेश हणमे ,9890440480

काल गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर महायुती सरकारनं आपलं बहुमत कायम राखलं आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, ‘आमचं ठरलंय’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. त्यानंतर आता पन्नास-पन्नास फॉर्म्युला यावर वेगवेगळी अंदाज बांधणी सुरू झाली आहे. विविध गल्लीबोळातील पुढाऱ्यांपासून मातब्बर राजकारण्यापर्यंत आडाखे लढवले जात आहेत.त्यात नव्यानं भर पडली आहे एका कार्टूनची. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक हटके कार्टून शेअर केले आहे.

त्यांनी ‘व्यंगचित्रकाराची कमाल’ बुरा ना मानो दिवाली हैं असं कार्टून शेअर केल्याने विविध चर्चेला ऊत आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वर हे कार्टून शेअर केलं. यामध्ये ‘वाघा’च्या ‘हाता’त ‘कमळ’ दिसत असून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये वाघाच्या गळ्यात घड्याळ दिसत आहे. त्यावर उत्तम व्यंगचित्र असणारे चित्र,सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहले आहे.

कार्टून मध्ये हे आहे स्पष्ट
शिवसेनेचे बोधचिन्ह वाघ आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे निशान घड्याळ आहे, कमळ हे भाजपाचे पक्ष चिन्ह आहे. या कार्टून मध्ये शिवसेनेकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा व काँग्रेसचा छुपा किंवा उघड पाठिंबा आहे. भाजपा बरोबर जर जमलं नाही तर त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा पर्याय खुला असल्याचं दिसून येतं असा अर्थ त्यातून निघत असल्याचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बहुमतासाठी जादुई आकडा १४५

शिवसेना + भाजपा = 105 + 56 = 161 (स्पष्ट बहुमत)
शिवसेना + राष्ट्रवादी = 56 + 54 = 110
भाजपा + राष्ट्रवादी =105 + 54 = 159
काँग्रेस +राष्ट्रवादी = 44 + 54 =98
काँग्रेस +राष्ट्रवादी आणि शिवसेना = 44 +54+ 56 = 154
असं आमदारांचं बलाबल या वरील प्रमुख पक्षांकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणाल्याप्रमाणे ‘आमचं ठरलंय’ हे होतं की पवारांचा जादूई करिष्मा वेगळे चित्र घडवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago