राष्ट्रवादीची आगामी विधानसभा निवडणूकीसाठी ‘शहर उत्तर’ ची चाचपणी 

पक्ष निरीक्षक सुरेश घुले गुरुवारी घेणार आढावा 

0
10

By-MH13 NEWS,नेटवर्क

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर ” शहर उत्तर ” विधानसभा मतदार संघासाठी उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले गुरुवार २० जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृहात पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी उमेदवाराबाबत बैठकीत चर्चा करून आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले आहे.

पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांच्यावर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासह मोहोळ, पंढरपूर आणि माळशिरस या अन्य तीन विधानसभा मतदारसंघाचीसुद्धा जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार निरीक्षक सुरेश घुले हे गुरुवार २० रोजी सोलापूर शहरात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता मोहोळ तर त्यानंतर दुपारी दोन वाजता सोलापूर शहर उत्तर मतदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी करून शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. तर शुक्रवार २१ जून रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर आणि याच दिवशी दुपारी ३ वाजता माळशिरस मतदारसंघासाठीसुद्धा उमेदवाराची चाचपणी करून आढावा घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here