नोकरी गेली, जगणं झालं मुश्किल, द्या इच्छामरण नाहीतर फाशी..!

राष्ट्रवादी काँग्रेसचं 'युवा आक्रोश'आंदोलन

0
398

सरकारला बेरोजगारांच्या आत्महत्या पहावयाच्या आहेत काय.? 

बेरोजगारीच्या बकासुराने देशभरातील तरुणाई चिरडली.. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापुरातील “युवा आक्रोश”मध्ये बेरोजगार युवकांकडून प्रतिकात्मक गळफास आंदोलन 

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – नोकरी गेली,जगणे झालं मुश्किल,इच्छा मरणाची परवानगी द्या नाहीतर फाशी द्या, अशा घोषणा देत जवळपास १० ते १२ बेरोजगार युवक आणि पदाधिकाऱ्यांनी  रोजगाराच्या मागणीसाठी सोलापुरात प्रतीकात्मक गळफास लावून आक्रमक आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधून घेतले. 

सोलापूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने पूनम गेटसमोर गुरुवारी “युवा आक्रोश “ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले  होते . युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,कार्याध्यक्ष रविकांत वरपे , युवकचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर बागवान आणि ग्रामीणचे युवकाध्यक्ष विक्रांत माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यात आला .

भाजप सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटी या आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. परिणामी उद्योगांवर मंदीचे सावंत आले असून देशभरात कोटींच्यावर तर महाराष्ट्रात लाखांच्या घरात लोकांचे रोजगार गेले आहेत. सर्वत्र बेरोजगारी डोंगरासारखी वाढत चालली असतानासुद्धा सरकार मात्र तरुणांना रोजगार देण्याबाबत आणि ज्यांचे रोजगार गेल्यामुळे बेरोजगार झालेल्यांसाठी रोजगार निर्मितीबाबत कोणतेच पाऊल उचलताना दिसत नाही. आज दुष्काळ आणि नापिकीमुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. ज्यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले. आता बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस कमालीची वाढू लागली आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे लोण बेरोजगारांपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकारने तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत युवकांनी आपला आक्रोश व्यक्त केला .

नरेंद्र – देवेन्द्र फसवणुकीचे केंद्र, रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा,रोजगार न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता . केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली . बुलेट ट्रेनच्या आधी बेरोजगारी रुळावर,बेकारीची शिडी विक्रमी पुतळ्यापेक्षा उंच,महाराष्ट्रात दीड लाख कंपन्या बंद आदी सरकारचे वाभाडे काढणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव,कार्याध्यक्ष संतोष पवार, राजन जाधव,जावेद खैरदी ,राम साठे,आप्पाराव कोरे,अहमद मासूलदार,चेतन गायकवाड, सुहास कदम,निशांत सावळे ,अमीर शेख,प्रशांत बाबर,विवेक फुटाणे,वासिम बुऱ्हाण ,दादाराव रोटे,राहुल काटे,प्रकाश जाधव,लखन गावडे,अनिल उकरंडे,तणवीर गुलजार,महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे,सायरा शेख,सिया मुलाणी,लता ढेरे,प्राजक्ता बागल,शोभा गायकवाड,नसीम खान,नसीमा शेतीसंदी यांच्यासह संजय पाटील, नितीन नवगिरे,लक्ष्मण भोसले,राजू हुंडेकरी ,बसू कोळी,शाम गांगर्डे,अरविंद दामजी ,बाळासाहेब मोरे,सलीम नदाफ,शाहरुख बागवान,सचिन लोंढे,,समाधान पवार,राम माने,सागर शितोळे,बंडू ढेकणे,प्रवीण साबळे,तुषार जक्का,रमीज कारभारी,राहुल पवार,सोमनाथ शिंदे,अक्षयकुमार साठे,निलेश आहिरे,संपन्न दिवाकर,बालाजी निच्चळ , सर्फराज बागवान,सचिन भोसले,जुबेर मुजावर, मोहसीन मुजावर,कल्पेश गायकवाड,राहुल वाल्मिकी आदी उपस्थित होते.

=================

बेरोजगारांच्या आत्महत्येला सरकारच राहणार जबाबदार  

देशात आणि राज्यात बेरोजगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. देशात १ कोटी १० लाख तरुणांचे रोजगार गेले आहेत. महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ६३६ कंपन्या बंद झाल्या आहेत. फडणवीस सरकार बेरोजगारांची मेगा भरती करण्यापेक्षा त्यांच्या पक्षात मेगा भरती करत आहेत. आज ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतोय त्याप्रमाणे महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या बघायच्या आहेत का?मंदीमुळे अनेक उद्योग तोट्यात आले आहेत. महापोर्टल कंपनी बंद करावी. अशा व्यापम घोटाळ्यातील कंपनीच्या हातात तरुणांचे भविष्य दिले आहे. औद्योगिक वसाहतीमधील हजारो मुले काम नसल्याने घरी परतत आहेत. पाच वर्षात भाजपने किती रोजगार आणले आणि किती जणांना रोजगार दिला याचा जाब देणे गरजेचे आहे. रोजगार द्या नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी बेरोजगार युवक मागणी करत आहे हे दुर्दैव आहे. बेरोजगारांच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार राहणार आहे.

महेबूब शेख – प्रदेशाध्यक्ष –  राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी 

महाराष्ट्रातील ४५ लाख तरुण बेरोजगार 

देशात ८ लाख ८५ हजार कंपन्या बंद पडल्या आहेत . दोन कोटी रोजगाराचे दाखविलेले गाजर फेल गेले आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बंद पडत आहेत. महाराष्ट्रातील ४५ लाख तरुण बेरोजगार झाले आहेत.  शेतकरी आत्महत्येचा सुशिक्षित महाराष्ट्र आज बेरोजगारांच्या आत्महत्येत पुढे येईल याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात भाजप सरकारकडून राजकारणाची पोळी पुन्हा भाजून घेण्यासाठी महाजानदेश यात्रेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे. हाच पैसा एखादा उद्योग आणण्यासाठी आणि त्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी खर्ची टाकला असता तर आज लाखो युवक रोजगारासाठी आपली गावे सोडून बाहेर पडली नसती.

रविकांत वरपे – प्रदेश कार्याध्यक्ष 

 

              

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here