Categories: महिला

पतीस ‘लिव्हर’ देऊन पुनर्जन्म देणारी पत्नी ‘संजीवनी’

By-MH13NEWS,नेटवर्क

जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जात आहे. महिला हीच खरी सबला आणि कुटुंबातील सर्वांचा आधार बनण्याची धडपड करत आहे हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे अशीच एका महिलेची सत्यकथा.. विशेष अशीच ..

गाव- मराठवाडी, पोष्ट-नागणसुर, ता- अक्कलकोट, जि.सोलापूर. येथील सौ. संजीवनी अशोक निंबाळकर यांची सत्यकथा .

सार्वजनिक वाचनालय व सामाजिक कार्य करणारे पती आणि दोन मुली व स्वतः ज्ञानगंगा प्रशाला, दहिटणे येथे सहशिक्षक आणि एक मुलगी १० वी ला व दुसरी ६ वी ला होती दोन्ही ही मुली खुप हुशार होत्या. अशा रितीने त्यांचा संसार ‘हम दो हमारे दो’ या म्हणी प्रमाणे अगदी रमत गमत चाललेला होता. पण नियतीच्या मनात काय होते माहित नव्हते.

जानेवारी-फेब्रुवारी २०१८ दरम्यान त्यांचे पती म्हणजे श्री अशोक भवानबा निंबाळकर यांच्या प्रकृती बिघडली व अक्कलकोट येथील फॅमिली डाॅक्टर मनोहर मोरे यांच्याकडे दाखविले त्यानंतर त्यांना कावीळ या आजाराचे निदान करण्यात आले व डाॅक्टरांच्या सल्यानुसार सोलापुरला उपचार घेण्यात आले परंतु कावीळ काही केल्याने ठीक होत नव्हती. सोलापुर येथील डाॅक्टर पुजारी यांच्या सल्यानुसार हैद्राबाद येथे पाठविण्यात आले. तेथेही १०-१५ दिवस उपचार केल्यानंतर कमी होत नसल्यामुळे शेवटी एप्रिल २०१८ अखेरला परत सोलापुर येथील अश्विनी हाॅस्पिटल मधे दाखल करण्यात आले. यावेळेपर्यंत त्यांची प्रकृती भरपुरच खालावली होती व डाॅक्टरांनी त्याना लिव्हर खराब झाले आहे आता येथे आम्ही काही करु शकत नाही तुम्ही पुणे किंवा मुबईला घेऊन जा असे सांगण्यात आले. नंतर पुणे येथील सह्याद्री हाॅस्पिटल मधे दाखल करण्यात आले व तेथील लिव्हर तज्ञ डाॅक्टर विभुते व त्यांची टिम त्यांचावर निदान करण्यास सुरवात केले व सर्व टेस्ट चे रिपोर्ट आल्यानंतर सांगितले की, यांचे पुर्णतः लिव्हर खराब झाले आहे व त्यांचे लिव्हर बदलल्याशिवाय पर्याय नाही व महत्वाचे म्हणजे यासाठी ४० लाखापर्यंत अंदाजे खर्च येईल. यावेळी आम्हां सर्व नातेवाईकांना फार मोठा धक्काच बसला. आणि लिव्हर बदल्याशिवाय पर्यायच उरला नव्हता आता काय करायचे कुणालाच सुचत नव्हते व आत्तापर्यंत ८-१० लाख खर्च झाले होते. आता लिव्हर कुठुन आणायचे हे कुणालाच सुचेना त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी या तयार झाल्या आणि मी लिव्हर देते असे म्हणाल्या त्यावर सर्वांची एकच प्रतिक्रिया होती की, तुम्ही देऊ नका. व लिव्हर डोनर साठी नोंदणी करण्यात आली परंतु लिव्हर मिळणे फार अवघड होते त्यात पेशंटची तब्बेत जास्तच खालावत चालली होती त्यामुळे डाॅक्टरांनी सांगितले की पत्नीचे लिव्हर दिले तर खर्च ही कमी येईल व कायदेशीर बाबी ही हाताळण्यास सोपे जाईल त्यावेळी सर्व नातेवाईकांनी त्यांना जीवावर उदार होऊन परवानगी दिली व त्यांचे विविध तपासणी अंती डाॅक्टरांनी सांगितले या त्यांचे लिव्हर त्या देऊ शकतात हे सर्व योगायोगच म्हणावे लागेल मग सर्वांनी पैशाची जूळवाजुळव चालु झाली परंतु अशोक निंबाळकर यांनी यासाठी नकार देउ लागले . बघताबघता मर्द वाघाच्या काळजाच्या भावाने म्हणजेच श्री दयानंद निंबाळकर यांनी २ महिने दिवसरात्र एक करुन १२ लाख रुपये सर्व नातेवाईकांडुन व मित्रमंडळींकडुन आणि निरनिराळ्या संस्थांडुन एकत्र केले.

नवर्याचि जीव तर वाचवावाच लागणार होता. व एकीकडे दोन मुली आहेत यांची चिंता सतावत होत होती व पैशाची ही पुर्णतः तरतुद होत नव्हती यामुळे त्यांचीही प्रकृती नाजुक होत होती. परंतु सौ. संजीवनी यांनी डॉक्टरांना माझे लिव्हर घ्या आणि लवकर माझ्या कुंकवाला वाचवा असा आग्रह धरला. पण त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे परिवार आणि नातेवाईकांचा धीर होत नव्हता.

लेकराचे दु:ख आईपेक्षा अधिक आणि कुंकवाचे सुख हे पत्नीपेक्षा कुणास कळू शकते? आणि या पतीव्रता सावित्रीच्या प्रेमाने सर्वांना झुकविले. सगळे नातेवाईक तयार झाले.

नंतर सर्व काही पैशाची जुळवाजुळव करुन आम्ही सर्वांनी डाॅक्टरला सांगितले की, आमच्याजवळ १२ लाख रुपये आहेत बाकीचे पैसे नंतर भरतो तुम्ही आॅपरेशन करा त्यावेळे डाॅक्टरांनी सांगितले की पैशाचे तुम्ही हाॅस्पिटल प्रशासनास सांगुन परवानगी मिळवा आम्ही आॅपरेशन करु असे म्हणाले. त्यावेळी परत दयानंद निंबिळकर व नातेवाईकांची धावपळ सुरु झाली परंतु काही केल्या जुळुन येत नव्हते मग आम्ही बाळासाहेब मोरे यांना संपर्क साधला असता त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निंधीतुन ३ लाख रुपये मंजुर करुन ते पत्र हाॅस्पिटल प्रशासनास फॅक्स केले त्यानंतर आम्ही डाॅक्टरांना विनंती केले. मग देवासारख्या डाॅक्टर विभुते सरांनी आमची परिस्थिती व गंभीरता पाहुन त्यांनी स्वतः हाॅस्पिटल प्रशासनाने विनंती करुन आमच्या पेशंटच्या आॅपरेशनची तारीख फिक्स झाली.

दि. ३० जुलै २०१८ रोजी दोघांसाठी सह्याद्री हाॅस्पिटल मध्ये आॅपरेशन थेटर सज्ज झाले. डॉक्टर विभुते यांच्या नेतृत्वाखाली ४-६ डॉक्टरांच्या टीमने एकाचवेळी दोघांचे ऑपरेशन सुरू केले.सतत १४ तास ऑपरेशन चालले. मिशन फत्ते झाले. अशोक राव जवळजवळ २४-३० तासानंतर शुध्दीवर आले. पत्नीने दिलेले लिव्हर काम करू लागले. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता.
भाऊ वाचला पण वहिनी बरी होईल का? काय होणार ? या कल्पनेने दयानंद निंबाळकर यांच्या अश्रूचा बांध फुटला. सर्वांनी समजूत काढली खूप धीर दिला

पती बरे होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माऊलीला खूप आनंद झाला. सावित्रीच्या परिस्पर्शाने पतीच्या जीवनाचे सोने झाले. त्यांचा नवा जन्म झाला होता. जिने त्यांना पहिला जन्म दिला होता ; ती या जगाला सोडुन गेली होती त्या माऊलीची खरी जागा या माऊलीने त्यांस पुनर्जन्म देऊन घेतला होता…

शब्दांकन:- मेजर प्रकाश जाधव

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

58 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

22 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago