माकपच्या वतीने शहरात राष्ट्रीय निषेध दिन

MH13 NEWS NETWORK

बड्या भांडवलदारांना अब्जावधी रुपयांची सवलत देताना देश आर्थिक संकटात नसतो का? – कॉ.आडम मास्तरांचा सवाल

सोलापूर दिनांक – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो च्या वतीने 16 जून रोजी केंद्र आणि राज्य सरकार च्या विरोधात देशव्यापी निषेध दिन पाळण्याची हाक देण्यात आली त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 16 जून रोजी सकाळी सोलापूरातील माकप च्या वतीने माजी आमदार, ज्येष्ठ कामगार नेते माकप चे राज्य सचिव कॉ नरसय्या आडम ( मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 30 ठिकाणी माकप शाखांच्या मार्फत खालील मागण्या घेऊन देशव्यापी निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी या मागण्या करण्यात आल्या.

१. इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत.

२. सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे.

३. मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे. शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा. बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा.

४. राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या.

यावेळी बापूजी नगर येथे निषेध व्यक्त करताना कॉ नरसय्या आडम (मास्तर) म्हणाले की, आज देशात आधीच बेरोजगारीने विक्राळ रूप धारण केले होते; त्यात लॉकडाऊनने १५ कोटी कामगारांना बेरोजगार केले आहे. देशातला मोठा जनविभाग उपजीविकेच्या साधनांपासून पूर्णतः वंचित झाला आहे. आपल्या घरांकडे पायी चालत जात असलेल्या मजुरांची काळीज फाडणारी उपासमार पाहून जनतेची काय अन्नान्नदशा झाली आहे, हे दिसत आहे. जनतेवर अशी दारूण परिस्थिती लादणाऱ्या सरकारचा देशभर सर्वत्र निषेध केलाच पाहिजे, असा निर्णय पॉलिटब्यूरोने घेतला आहे.प्रशासनाने लागू करण्यात आलेले नियम काटेकोरपणे पाळूनच आणि शारीरिक अंतर राखत, मास्कचा वापर करत रस्त्यावर येऊन निषेध केलेला आहे.
ते बोलताना पुढे म्हणाले केंद्र आणि राज्य सरकार ने यावर लक्ष केंद्रित करून देशातील कामगार कष्टकरी ,मध्यमवर्गीय,गोर गरीब जनतेला या कोरोना विषाणूच्या महामारीपासून बचाव करण्यासाठी अन्नधान्य, नागरी मूलभूत सुविधा, आरोग्य सुविधा आणि आर्थिक मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
धनदांडगे आणि बड्या भांडवलदारांना अब्जावधी रुपयांची सवलत देताना आर्थिक संकटाचा सूक्ष्म विचार अर्थतज्ञांकडून का केला जात नाही ? असा सवाल केला.गरिबांचे प्रश्न म्हटले की, देश आर्थिक संकटात आहे अशी चिंता व्यक्त केली जाते.ही निंदनीय बाब आहे.
जर सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आगामी काळात सरकारच्या विरोधात आरपार ची लढाई करणार असल्याचा इशारा आडम यांनी दिला.

शहर व कुंभारी परिसरात खालील ठिकाणी माकपच्या शाखांच्या वतीने
बापूजी नगर शाखा – माकप चे राज्य सचिव कॉ नरसय्या आडम मास्तर, नगरसेविका कामीनीताई आडम, कुरमय्या म्हेत्रे,माशप्पा विटे, मोहन कोक्कुल

दत्त नगर शाखा – माकप जिल्हा सचिव एम.एच शेख,माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी,माजी नगरसेविका सुनंदा बल्ला,अशोक बल्ला,

भगवान नगर शाखा – माकप राज्य समिती सदस्या माजी नगरसेविका नसीमा शेख,श्रीनिवास गड्डम, गीता वासम

शहीद कुर्बान हुसेन नगर शाखा – माकप राज्य समिती सदस्या माजी नगरसेविका कॉ नलिनी कलबुर्गी, दाऊद शेख, जावेद सगरी, नरेश दुगाणे

कॉ गोदूताई परुळेकर वसाहत कुंभारी- अ.ब.क परिसरात 35 ठिकाणी विल्यम ससाणे, बापू साबळे,फातिमा बेग, विक्रम कलबुर्गी,सनातन म्हेत्रे,हसन शेख,रफिक काझी आप्पाशा चांगले, एजाज खलिफा

कॉ.मीनाक्षीताई साने वसाहत कुंभारी – वसीम मुल्ला, राजेंद्रप्रसाद गेंट्याल

लष्कर शाखा- माकप सचिव मंडळ सदस्य अब्राहम कुमार, सनी शेट्टी,

मोदी शाखा – शंकर म्हेत्रे,अमित मंचले

प्रजा नाट्य मंडळ – अनिल वासम

शास्त्री नगर शाखा – आसिफ शेख,अकील शेख,इलियास सिद्दीकी

डी.वाय.एफ.आय.शाखा- नूर अहमद अन्सारी

एस. एफ. आय.- मल्लेशाम कारमपुरी

इंदिरा नगर शाखा – माजी नगरसेविका शेवंताताई देशमुख

सत्यसाई नगर शाखा – दत्तात्रय साखरे

विजापूर नाका शाखा – बजरंग गायकवाड

हार्टलँड कंपाऊंड,हेजनपूर, फकरोद्दीन नगर शाखा – नलिनी कलबुर्गी

कोणापुरे चाळ शाखा – रंगप्पा मरेड्डी

मित्र नगर , किसान नगर शाखा – माकप राज्य समिती सदस्य सिद्धप्पा कलशेट्टी, किशोर मेहता

गांधी नगर शाखा – बाबू कोकणे, लिंगव्वा सोलापूरे, शहाबुद्दीन शेख

शहापूर चाळ, राहुल गांधी नगर शाखा – म.हानिफ सातखेड, रफिक जमादार

आदी ठिकाणी सर्व माकप चे शाखा सचिव व कार्यकर्ते निषेध दिन पाळला.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

16 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago